पुणे शहर

एजंटमार्फत वसुलीच्या तक्रारींची अर्थमंत्र्यांनी घेतली दखल- आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे : कर्जाचे हप्ते वसुलीसाठी एजंट वापरून कर्जदाराला छळण्याच्या तक्रारींची दखल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घेतली असून एजंट पध्दत वापरणाऱ्या वित्तीय संस्थांच्या तपासणीचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

एजंट मार्फत वसुलीचा तगादा लावून मनस्ताप दिला जातो, दादागिरी केली जाते अशा तक्रारी अनेक कर्जदारांनी केल्या होत्या. त्या विरोधात कारवाई करावी, अशा एजंटच्या दहशतीला पायबंद बसवा अशी मागणी पोलीस खात्याकडे यापूर्वी आमदार शिरोळे यांनी केली होती. त्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनाही पत्र पाठविण्यात आले होते. या पत्राची दखल त्यांनी घेतली.एजंट वापरणाऱ्या वित्तीय संस्थांची तपासणी करावी असे निर्देश रिझर्व्ह बँकेला मंत्रीमहोदयांनी दिले, असे आमदार शिरोळे यांनी पत्रकात आहे.

Img 20201118 wa0057
Img 20201114 wa0195
Whatsapp image 2020 11 13 at 2. 39. 13 pm

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये