पुणे शहर

संगीतकार नरेंद्र भिडे यांचे निधन, ‘सरसेनापती हंबीरराव’ ठरला शेवटचा चित्रपट

पुणे : सुप्रसिद्ध संगीतकार नरेंद्र भिडे ह्यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या धक्क्याने दुखःद निधन झाले आहे. ते 47 वर्षांचे होते. अंत्यदर्शन सकाळी 9.30 वाजता डॉन स्टुडिओ, कर्वे नगर पुणे  इथे तर सकाळी 11 वाजता वैकुंठ येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. भिडे यांच्या पश्चात आई वडील पत्नी आणि दोन मुले आहेत.

सिव्हिल इंजिनियरची पदवी घेतलेल्या संगीतकार नरेंद्र भिडे यांनी अनेक नाटक, मालिका, मराठी चित्रपट संगीतबद्ध केले आहेत. त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीताचे शिक्षण उस्ताद महंमद हुसेन खान साहेब, स्वरराज छोटा गंधर्व, बाळासाहेब मते, शैला दातार, सुधीर दातार, सुहास दातार यांच्याकडे तर पाश्चिमात्य संगीताचे शिक्षण हेमंत गोडबोले यांच्याकडे घेतले.

Img 20201210 wa0001

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये