पुणे शहर

भाजपच्या सत्ता काळात महापालिकेत हजारो कोटींचा भ्रष्टाचार : सचिन अहिर

पुणे : महापालिकेमध्ये भाजपची सत्ता असताना हजारो कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून, त्याची कॅग मार्फत चौकशी झाली पाहिजे. या मागणीसाठी शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.

यावेळी सचिन अहिर म्हणाले की, “स्मार्ट सिटीसह अन्य कामांची बिलं काम न करता काढण्यात आली आहेत. यामुळे पुणे महापालिकेत भाजपची सत्ता असताना हजारो कोटींचा भ्रष्टाचार झाला असणार आहे. म्हणून पुणे महापालिकेच्या कारभाराची कॅग मार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे करणार आहोत. त्यामधून सत्य परिस्थिती समोर येईल. तसेच, आमच्या मागणीची दखल न घेतल्यास येत्या काळात आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत.” असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

दसरा मेळावा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात

”कोणी किती ही दावे केले तरी मेळावा हा शिवसेनेचाच होणार आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली होणार.” असल्याचे सचिन अहिर यांनी सांगितले.

Img 20220804 wa0019951227047229036961

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये