महाराष्ट्र

चंद्रकांत पाटलांचे रश्मी ठाकरेंना तक्रारीचे पत्र

पुणे : सामना’ तून सातत्याने गलिच्छ भाषेत लिखाण केले जात असल्याने आपण संपादक रश्मी ठाकरे यांना पत्र लिहिणार असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं होतं. त्यानुसार त्यांनी रश्मी ठाकरेंना पत्र पाठवल्यांची माहिती चंद्रकांत पाटलांनी (Chandrakant Patil) दिली.

औरंगाबादच्या संभाजीनगर नामांतरास काँग्रेसचा विरोध असल्याने शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी पाटील यांनी केली होती. त्यानंतर पाटील यांच्याबाबत सामनातून गलिच्छ भाषा वापरली गेली होती. त्यावरुन पाटील यांनी रश्मी ठाकरे (Rashmi Thackray) यांनी पत्र लिहून आपले मत व्यक्त केलं. यामध्ये पाटील यांनी लिहिलं की, ‘मी तुम्हाला ओळखतो, तुम्ही सुसंस्कृत आहात. त्यामुळे तुम्हाला ही भाषा आवडत नसेल. पण ती भाषा तुम्हाला आवडत असेल तर माझ्या तुम्हाला शुभेच्छा. सामनात जे जे लिहिलं जात त्याला तुमची सहमती आहे असं होतं. सहमती असेल तर माझी काही हरकत नाही, असंही पत्रात म्हटलं आहे

1609323038998 udyam bank big advt 30 dec 2020

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये