पुणे शहर

महापालिकेने बैठक घेऊन पुणे शहरातील लसीकरण मोहीमेबाबत माहिती द्यावी.

पुणे : राज्य शासनाने संपूर्ण महाराष्ट्रात कोविड लसीकरणबाबत घोषणा केली दि.16 जानेवारी 2021 पासून लसीकरणाची मोहीम राबविण्यात येणार आहे. पुणे महापालिकेनेही याबाबत उपाययोजना आखणेची कार्यवाहीची सुरूवात केली आहे. परंतु अफवा व विविध बातम्यांमुळे नागरिकांमध्ये संभ्रम तयार झाला आहे, त्यामुळे या लसीकरण मोहिमेबाबत संबंधित खातेप्रमुख, संबंधित अधिकारी व सर्व पक्षाचे गटनेते यांचेसमवेत तातडीने बैठक घेवून सर्व बाबींची माहिती सविस्तरपणे देण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी केली आहे.

या संदर्भातील पत्र धुमाळ यांनी महापालिका आयुक्तांकडे दिले आहे. गेली अनेक महिने नागरिक या लसीकरण मोहिमेची वाट पाहत आहेत. आता या लसीकरण मोहिमेला सुरवात होत असताना त्याची सुस्पष्टता व माहिती पुणेकरांसमोर आणणे गरजेचे असल्याचे धुमाळ यांनी म्हंटले आहे.

पुणे महापालिकेकडून संपूर्ण शहरात कोविड
लसीकरणाबाबत कोणकोणत्या उपाय योजना, लसीकरण बुथ, याविषयी नेमणूक करावयाचे अधिकारी व कर्मचारी वर्ग, लसीकरण बुथ ज्याठिकाणी आहे त्याठिकाणच्या उपाय योजना याची सर्व माहिती तातडीने बैठक घेऊन देण्यात यावी अशी मागणी धुमाळ यांनी केली आहे.

Img 20201213 wa0074
1609323038998 udyam bank big advt 30 dec 2020 scaled

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये