पुणे शहर

सुरक्षा कवच विमा योजनेचे चेक देण्यास पालिकेतील सत्ताधाऱ्यांकडे वेळ नाही : दिपाली धुमाळ

पुणे : पुणे महानगरपालिकेतील कोरोनाच्या (कोविड-१९) काळात सेवेत कार्यरत असताना मयत झालेल्या मनपा सेवकांच्या वारसास रक्कम १ कोटी रुपयांची मदत महापौरांनी जाहीर केली होती. रुपये १ कोटी पैकी ५० लाख रुपये हे केंद्र शासनाचे व रक्कम रु. ५० लाख रुपये हे महानगरपालिकेचे असे मान्य करण्यात आले होते. मृत सेवकांच्या वारसास मनपा सेवेत रुजु करुन घेतल्यास त्या मृत सेवकांच्या वारसांना रक्कम रु.२५ लक्ष देण्याचे मान्य केले होते. परंतु सद्यस्थितीत सुमारे ९ महिने उलटुन सुद्धा मृत सेवकांच्या वारसास मदत निधी न मिळाल्याचे दिसत आहे  त्यामुळे महापालिकेतील सत्ताधारी मृत सेवकांच्या नातेवाईकांची हेळसांड करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी केला आहे. There is no time to give checks of security cover insurance scheme to those in power in the Pune muncipal corporation
    

धुमाळ यांनी म्हंटले आहे की , कोरोनाच्या काळात आपल्या ४८ अधिकारी व कर्मचारी यांचे सेवाकाळात निधन झाले आहे. जेव्हा कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत होता अशा काळात आपल्या पुणे महानगरपालिकेचे सर्व सेवकांनी जिवाची पर्वा न करता चोख कामगिरी बजावली आहे. ही कामगिरी बजावताना सेवकांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या घराचा मुख्य आधार  गमावला गेला असल्याने कुटुंबे अडचणीत आलेली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार प्रशासनाने सदर सुरक्षा कवच विम्याचे चेक तयार केले आहेत. मात्र सत्ताधाऱ्यांना वेळ नसल्याने चेक दिले जात नाहीत. सदरचे चेक तयार असुन मृतांच्या वारसदारांवर अन्याय का होत आहे असा सवाल धुमाळ यांनी उपस्थित केला आहे. 

उद्या दि.२६ जानेवारी २०२१ रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन मृत सेवकांच्या वारसांना चेक अदा करण्यात यावे, तसेच जर सत्ताधारी यांना वेळ नसेल तर प्रशासनाने ते चेक सपुर्त करावेत. तसेच केंद्र शासनाकडुन देण्यांत येणारे आर्थिक सहाय्य पाठपुरावा करुन ती रक्कम सुध्दा तातडीने देण्याबाबत योग्य ती खबरदारी घेवून मृत वारसांना देण्यात यावी अशी मागणी धुमाळ यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Img 20210116 wa0007

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये