पुणे शहर

पुणे शहराच्या पाण्यात कपात करण्याची जलसंपदा विभागाची भूमिका चुकीची – महापौर मुरलीधर मोहोळ

पुणे : पुणे शहराच्या पाणी प्रश्नासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत विधानभवनात बैठक झाली. या बैठकीला शहरातील लोकप्रतिनिधी, जलसंपदा खात्याचे अधिकारी आणि महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. पुणे शहराचा आताचा पाणी कोटा आणि आगामी काळातील गरज यावर बैठकीत चर्चा झाली.(The role of water resources department in reducing water in Pune city is wrong – Mayor Murlidhar Mohol )

महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, जलसंपदा विभागाने भामा-आसखेडचे पाणी सुरू झाल्यानंतर भामा-आसखेडमधून मिळणारे 2.6 टीएमसी पाणी हे खडकवासला धरणातून शहराला मिळणाऱ्या पाण्यातून हे कमी करावे, अशी भूमिका जलसंपदा विभागाची आहे.  जलसंपदा विभागाची ही भूमिका चुकीची आहे.

Img 20210126 wa0005
Img 20210126 wa0006

पुणे शहराच्या महापालिका हद्दीत नव्याने 23 गावांचा समावेश झालेला आहे आणि एकूण लोकसंख्या जवळपास ६३ लाखांपर्यंत जाणार आहे. त्यामुळे पुणे शहराला मिळणारे पाणी कोणत्याही परिस्थितीत कमी होऊ नये,अशाप्रकारे पाणी कमी करण्याचा कुठलाही निर्णय पुणेकरांच्या हिताचा नाही. त्यामुळे तो निर्णय घेऊ नये अशी आग्रही भूमिका मोहोळ यांनी मांडली.

Img 20210126 wa0007

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये