कोथरुड

कोथरूडमधील शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिराचे अनिल शिदोरे यांच्या हस्ते उद्घाटन

कोथरूड :  महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित कक्षाचे सचिव तथा उपविभाग अध्यक्ष संजय काळे आणि प्रभाग अध्यक्ष गणेश शिंदे यांच्या संकल्पनेतून कोथरूड मतदारसंघातील तरुण-तरुणींसाठी मोफत शिवकालीन युद्धकला मर्दानी खेळांच्या प्रशिक्षण शिबिराचं आयोजन जीत मैदान कोथरूड येथे करण्यात आले.या शिबीराचा उद्घाटन समारंभ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अनिल शिदोरे, बाबू वागस्कर आणि पुणे शहर अध्यक्ष अजय शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला. ( Anil Shidore inaugurates Shivakalin martial arts training camp at Kothrud )

याप्रसंगी बोलताना मनसेचे नेते अनिल शिदोरे यांनी सर्वप्रथम ज्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित केला होता असे ॲड. किशोर शिंदे यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा दिल्या. शिवकालीन युद्धकला तसं पाहिलं तर चारशे वर्षांपूर्वीच छत्रपती शिवाजी महाराजांनी आपणास आत्मनिर्भर होण्याचा संदेश दिला होता परंतु काळाच्या ओघामध्ये हे मर्दानी खेळ युद्ध कला नाहीशा होऊन गेल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना सदैव मराठी भाषा मराठी माणूस आणि मराठी संस्कृती यावर काम करीत असते परंतु या ठिकाणी मर्दानी खेळ,शिवकालीन युद्धकला शिकण्याची संधी उपलब्ध करून महाराष्ट्राची परंपरा जपण्याचा संयोजकांनी प्रयत्न केला आहे. कोथरूड मधील तरुण-तरुणींना अगदी मोफत ही युद्धकला शिकण्याची संधी मिळवून दिल्याबद्दल संयोजक संजय काळे आणि गणेश शिंदे यांचे आभार मानले. या प्रशिक्षणाचा तरुण-तरुणींनी लाभ घेऊन त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून नुसतं खेळायचं कसं त्यापेक्षा जगायचं कसं ही कला देखील आत्मसात करणे गरजेचे आहे.

Img 20210131 wa0061

सिनेअभिनेते आणि महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे राज्य उपाध्यक्ष रमेश परदेशी बोलताना म्हणाले संपूर्ण जगाला ज्या शिवकालीन युद्धकलेने लढायला शिकवलं ही युद्धकला काळाच्या ओघात मध्ये आपण विसरत चाललो आहे. सध्याच्या युगामध्ये मुले बैठे खेळ किंबहुना मोबाईल गेम वेब सिरीज यातच अडकून बसले आहेत त्यातच लॉक डाऊन यामुळे मुलांनी कुठे तरी मैदानावर येऊन खेळ खेळण्याची गरज निर्माण झाली आहे. शिवकालीन युद्धकला जिवंत ठेवण्याची गरज असताना संयोजकांनी या युद्धकला शिकण्याची संधी निर्माण करून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले.

Img 20210128 wa0172

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे शहराच्या महिला अध्यक्षा रूपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या कोरोणाच्या काळामध्ये सर्व मुले घरामध्ये डांबुन होती आता कुठेतरी वातावरण पूर्ववत होण्यास सुरुवात झालेली असताना या प्रशिक्षण शिबिरामध्ये लाठीकाठी दांडपट्टा तलवारबाजी भाला चालविणे आधी मर्दानी खेळ शिकवले जाणार असल्यामुळे निश्चितच सर्व प्रशिक्षणार्थी मुलामुलींची प्रतिकार शक्ती वाढण्यास सहाय्य होईल. या पारंपरिक खेळांचा सर्वात जास्त फायदा मुलींना होणार आहे कारण हल्लीच्या काळामध्ये मुलींना स्वसंरक्षण करण्याची गरज निर्माण झालेली आहे.

या प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी मनसेचे नेते अनिल शिदोरे, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष रणजित शिरोळे, पुणे शहर अध्यक्ष अजय शिंदे, पुणे शहर महिलाध्यक्ष रूपाली ठोंबरे पाटील, चित्रपट सेना राज्य उपाध्यक्ष रमेश परदेशी, दीदी विभागाचे सरचिटणीस ॲड.अरुण लंबूगोळ, मनविसे पुणे जिल्हाध्यक्ष प्रशांत कनोजिया,माजी नगरसेविका पुष्पाताई कनोजिया,सुरेखाताई मकवान, विभाग अध्यक्ष सुधीर धावडे,विभाग अध्यक्ष सुरेखाताई होले, मनविसे विभाग अध्यक्ष  शशांक अमराळे, वाहतूक सेनेचे बाळासाहेब सणस राजाभाऊ रासकर यांच्यासह बहुतांश मनसे पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संयोजन संजय काळे,गणेश शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन सुप्रिया संजय काळे व स्नेहल गणेश शिंदे यांनी करताना हे शिबिर पुढील महिनाभर सुरू असल्यामुळे कोथरूड मधील तरुण-तरुणींनी मोठ्या संख्येने या प्रशिक्षण शिबिरामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये