कोथरुड

पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कोथरूडमधील अतिक्रमणांकडे दुर्लक्ष ; अल्पना वरपे यांची आयुक्तांकडे कारवाईची मागणी..

कोथरुड : कोथरूड डेपो-बावधन खुर्द या प्रभाग क्रमांक १० मधील रस्त्यांवर व पदपथांवर झालेल्या अतिक्रमणांकडे वारंवार तक्रार करूनही पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप करत स्थानिक नगरसेविका अल्पना वरपे यांनी आखेर आज महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडेच निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांनाही याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे. Neglect of encroachments in Kothrud by the encroachment department of the municipality;  Alpana Warpe demands action from the Commissioner.

प्रभाग क्रमांक १० मधील एकलव्य चौक, कुमार परिसर, शांतिबन चौक, सागर कॉलनी, आशिष गार्डन चौक, वेदभवन मंदिर परिसर, कोथरूड डेपो, भुसारी कॉलनी परिसरातील पदपथांवर तसेच दुकानांसमोरील जागेमध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृत पणे हातगाडी व टपऱ्यांची अतिक्रमणे झाली आहेत. या अतिक्रमणांमुळे ज्येष्ठ नागरिक तसेच पादचाऱ्यांना पदपथाने चालणे देखील मुश्कील झाले आहे.

स्थानिक नागरिक वारंवार याबाबत आमच्याकडे तक्रारी करत आहेत. तसेच क्षेत्रीय कार्यालयातील प्रभाग समितीतील बैठकीमध्ये सुद्धा या विषयावर वारंवार आम्ही मागणी करून देखील आपल्या विभागा मार्फत अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप अल्पना वरपे यांनी केला आहे.

Img 20210131 wa0061

वर उल्लेख केलेल्या बहुतांश ठिकाणी अपघात
होऊन नागरिकांना प्राण देखील गमवावे लागले आहेत, या बाबत संबधित विभागाशी पत्र व्यवहार केला परंतु तक्रार केल्यानंतर वरवरची कारवाई करण्या व्यतिरिक्त अद्याप कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचे वरपे यांच्याकडून सांगण्यात येत आहे.

लवकरात लवकर वर नमूद केलेल्या ठिकाणी त्वरित कारवाई करण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात याव्यात व  नागरिकांना चालण्यासाठी पदपथ मोकळे करून देण्यात यावे अशी मागणी वरपे यांनी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश चिटणीस गणेश वरपे, कोथरुड मतदार संघाचे अध्यक्ष पुनीत जोशी उपस्थित होते.

रस्त्याच्या कडेने व पदपथावर झालेल्या अतिक्रमणावर स्थानिक नगरसेविका जर कारवाईची मागणी करत असेल आणि पालिका प्रशासन जर त्याकडे दुर्लक्ष करत असेल तर प्रशासनाच्या या भूमिकेविषयी शंका उपस्थित केली जात असून नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

या संदर्भात कोथरुड बावधन क्षेत्रीय कार्यालयाचे महापालिका सहाय्यक आयुक्त संदीप कदम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, अतिक्रमणांवर वारंवार कारवाई होतच असते. आपण झोनिंग देखील केलेले आहे पण नगरसेविका अल्पना वरपे यांनी मूळ ठिकाणे सांगीतली असतील तर पुन्हा कारवाई केली जाईल.

Img 20210128 wa0172

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये