पुणे शहर

एकमेकांना समजून घेऊन काम केल्याने उद्यम बॅंकेची प्रगती – खासदार गिरीश बापट.

श्रीमती अर्चना लडकत यांची उद्यम बॅंकेच्या स्वीकृत संचालक पदी निवड

पुणे : इतर ठिकाणी एकमेकांची समजूत काढण्यात शक्ती खर्च होते मात्र उद्यम बॅंकेत एकमेकांना समजून घेऊन काम केले जाते त्यामुळेच बॅंक प्रगती पथावर असल्याचे गौरवोद्गार खासदार गिरीश बापट यांनी काढले.पुढील काळात सहकार क्षेत्रापुढे अनेक आव्हाने आहेत मात्र सर्वांनी एकत्र येउन काम केले तर ही आव्हाने सहज पेलता येतील असे ही ते म्हणाले.सहकारी बॅंकांनी सामान्य व्यावसायिकांना कर्ज पुरवठा करुन अडी अडचणीच्या काळात मदत केली आहे त्यामुळे सहकारी बॅंकांचे योगदान महत्त्वाचे आहे असेही ते म्हणाले.

बॅंकेच्या अध्यक्षपदी असताना महेश लडकत यांचे दु:खद निधन झाले,त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी श्रीमती अर्चना लडकत यांची आज बॅंकेच्या स्वीकृत संचालक पदी निवड करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.यावेळी बॅंकेचे प्रभारी अध्यक्ष शिरीष कुलकर्णी,तज्ञ संचालक दिनेश गांधी व महेंद्र काळे,बॅंकेचे माजी अध्यक्ष व संचालक संदीप खर्डेकर,दिलीप उंबरकर,पांडूरंग कुलकर्णी,माजी उपाध्यक्ष लीनाताई अनास्कर,संचालक निरंजन फडके,मनोज नायर,गोकुळ शेलार,सीताराम खाडे,राजन परदेशी,मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक देशपांडे व इतर मान्यवर उपस्थित होते.

Img 20210303 wa0159

यावेळी खा.गिरीश बापट यांच्या हस्ते अर्चना लडकत यांचा संचालक पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.बॅंकेच्या वतीने शिरीष कुलकर्णी यांच्या हस्ते खा.गिरीश बापट यांचा सत्कार करण्यात आला.माझे पती महेश लडकत यांची सर्व स्वप्न मी पूर्ण करेन असे भावनिक मनोगत श्रीमती अर्चना लडकत यांनी व्यक्त केले.मी बॅंकेच्या कामात जबाबदारीने लक्ष घालेन आणि उत्तम काम करेन असेही त्या म्हणाल्या.
बॅंकेचे प्रभारी अध्यक्ष शिरीष कुलकर्णी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले तर संचालक संदीप खर्डेकर यांनी सूत्रसंचालन केले.

Img 20210223 wa0156

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये