पुणे महापालिका सहआयुक्तांना जीवे मारण्याची धमकी देऊन सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या आरोपींना जामीन मंजूर

पुणे : पुणे महापालिका सहआयुक्त संदीप कदम यांना जीवे मारण्याची धमकी देवुन सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.Bail granted to accused who obstructed government work by threatening to kill Pune Municipal Corporation Joint Commissioner

कोथरूड येथील भीमनगर ,पौड रोड येथील नवीन डीपी रस्त्यामध्ये अडथळा ठरणाऱ्या घरांवरती दि २३/२/२०२१ रोजी अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यास गेलेल्या पुणे महापालिका सहआयुक्त संदीप कदम व इतर मनपा कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून तसेच जिवे मारण्याची धमकी देवुन सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या आरोपी नामे १) जावेद शेख,२)रइज शेख ३) हमीद पल्ला व इतर ३ सर्व राहणार कोथरूड यांच्या विरोधात कोथरूड पोलिसांनी भा द वी कलम ३५३,१४३,१४९,५०४,५०६ अन्वये गुन्हा दाखल केलेला होता .
दाखल गुन्हामध्ये अटक होवू नये यासाठी आरोपींनी मे जिल्हा व सत्र न्यायालया कडे अधयक्षतेखालील ॲड. सतिश कांबळे व ॲड अमेय बलकवडे यांच्या मार्फत अटकपूर्व जामीन अर्ज केलेला होता . सदरील अर्जवरती झालेल्या युक्तीवादा नंतर आरोपींची बाजू लक्षात घेवुन कोर्टाने आरोपींना अटकपूर्व जामीन मंजुर केला आरोपींच्या वतीने ॲड.सतिश कांबळे व ॲड.अमेय बलकवडे यांनी कामकाज पाहिले






