कोथरुडपुणे शहर

रुग्णालयांच्या निर्जंतुकीकरणाला प्राधान्य ; चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून निगेटिव्ह ion जनरेटरचे संच उपलब्ध

पुणे : कोरोनापासून बचावासाठी आणि रुग्णालयांच्या निर्जंतुकीकरणासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार  चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड मतदारसंघातील सुतार दवाखान्याला निगेटिव्ह ion जनरेटरचे चार संच उपलब्ध करून दिले आहेत. यासाठी एचडीएफसीने आपल्या सीएसआर फंडातूनही मदत केली आहे.Set of Negative Ion Generators available through Chandrakant Patil Priority for Disinfection of Hospitals

Img 20210319 wa0097

कोरोनापासून बचावाला सध्या प्राधान्य दिले जात असून, रुग्णालयांचे निर्जंतुकीकरण करणे गरजेचे आहे. त्यासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी निगेटिव्ह ion जनरेटरचे चार संच उपलब्ध करून दिले असून, यासाठी एचडीएफसीने आपल्या सीएसआर फंडातूनही मदत उपलब्ध करून दिली आहे. हे चारही संच आज पाटील यांनी दवाखान्याच्या प्रमुख डॉ. अंजली टिळेकर यांना सुपूर्द केले. या संचाच्या माध्यमातून सुमारे चारशे चौरस फूट इतक्या भागाचे निर्जंतुकीकरण करणे शक्य होते.

यावेळी पुणे शहर भाजपा उपाध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, स्थानिक नगरसेविका आणि प्रभाग समिती अध्यक्षा हर्षाली माथवड, शहर सुधारणा समिती सदस्या वासंती जाधव आदी उपस्थित होते.

Img 20210313 wa0015

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये