पुणे शहर

पुण्यात रुग्णसंख्या कमी झाली नाही तर 2 एप्रिलपासून लॉकडाऊन, अजित पवारांचा पुणेकरांना 8 दिवसांचा निर्वाणीचा इशारा ;  हे आहेत नवे नियम…

पुणे : शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. पुढील आठ दिवसात शहरातील रुग्णसंख्या कमी झाली नाही तर नाईलाजास्तव पुढच्या शुक्रवारी ( 2 एप्रिल)  लॉकडाऊनसंदर्भात  निर्णय घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहे. त्यामुळे पुढचे आठ दिवस पुणेकरांसाठी महत्त्वाचे असल्याचेही अजित पवार यांनी सुचित केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्यात आली. या बैठकीला सर्व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि महापौर,राजकीय पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार बोलत होते.While the number of patients in Pune has not decreased, Ajit Pawar has been locked down since April 2

अजित पवार म्हणाले,  पुढच्या शुक्रवारी लॉकडाऊनच्या बद्दल निर्णय घेण्यात येईल. कितीही इच्छा नसली तरी येत्या पाच सहा दिवसात अशीच रुग्णवाढ होत राहिली तर लॉकडाऊनशिवाय  पर्याय राहणार नाही .आज झालेल्या बैठकीत अनेकांचे खासकरून वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींचे असे मत होते की कोरोना प्रादुर्भावाची साखळी तोडायची असेल तर लॉकडाऊन करावा लागेल.  येत्या पाच सहा दिवसात काय होतं त्यावर ठरेल.

आजच्या बैठकीत घेण्यात आलेले नवे नियम

Img 20210319 wa0097

1 एप्रिलपासून  सर्व लोकप्रतिनिधींनी खासगी कार्यक्रम पूर्णपणे बंद

शाळा-महाविद्यालयं 30  एप्रिलपर्यंत बंद राहतील.

मॉल, चित्रपटगृहांसाठी 50 टक्के उपस्थितीचा नियम

सार्वजनिक बस वाहतूक सुरू

लग्न समारंभात 50 लोकांची उपस्थिती

अंत्यविधीसाठी 20 लोकांचीच परवानगी

सार्वजनिक उद्याने, बागबगीचे फक्त सकाळीच सुरू

लॉकडाऊन केला तर गोरगरीबांचा रोजी-रोटीचा प्रश्न निर्माण होतो. तो होऊ द्यायचा नाही म्हणून नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळणे आवश्यक आहे, असे  आवाहन अजित पवार यांनी या वेळी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये