पुणे शहर

खडकवासल्याच्या पाण्यात कोसळली भरधाव कार; एकाच कुटुंबातल्या चौघींवर काळाचा घाला, वडील मात्र वाचले

पुणे : पुणे -पानशेत रस्त्यावर मन सुन्न करणारी अशी एक घटना घडली आहे. या मार्गावरून जाणाऱ्या एका कारला झालेल्या दुर्दैवी अपघातामध्ये एकाच कुटुंबातील चार महिलांचा मृत्यू झाला आहे. पानशेतकडून पुण्याकडे येणाऱ्या वळणावळणाच्या रस्त्यावर चालकाचं नियंत्रण सुटलं आणि खडकवासला धरणाच्या बॅकवॉटरमध्ये कार कोसळली. मृतांमध्ये आई आणि तीन मुलींचा समावेश आहे. केवळ वडील या अपघातातून बचावले आहेत. हा प्रकार समजल्यानंतर परिसरातील नागरिकांनी याठिकाणी गर्दी केली होती.Bhardhaw car crashes into water; Four members of the same family were killed, but the father survived

Img 20210223 wa0156

पुणे पानशेत रस्त्यावर कुरण फाट्याजवळ हा अपघात घडल्याचं समोर आलं आहे. एकाच कुटुंबातीत सदस्य सँट्रो कारमध्ये पानशेतकडून पुण्याकडे निघाले होते. त्यावेळी कारच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार थेट खडकवासला धरणाच्या बॅक वॉटरमध्ये कोसळली. या अपघातामध्ये कारमधील चार महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दुर्घटनेनंतर स्थानिकांनी चारही मृतदेह बाहेर काढले आहेत. चालकाला म्हणजे वडिलांना वाचविण्यात यश आलं आहे. घटनास्थळी वेल्हे पोलीस ठाण्याच्या पानशेत दुर क्षेत्रातील पोलीस कर्मचारी दाखल झाले आणि त्यांनी मदतकार्य केले. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं होतं.

दुर्घटनेत वडिलांना वाचवण्यात यश आलं असलं तरी एकाच कुटुंबातील तीन मुली आणि आई अशा चार जणींचा मृत्यू झाला आहे. अल्पना विठ्ठल भीकुले (45), मुलगी प्राजक्ता (21), प्रणिता (17) आणि वैदेही (8) यांचा मृतांमध्ये समावेश आहे. यात विठ्ठल केशव भिकुले (46) हे बचावले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये