पुणे शहर

रेमडेसिवीर इंजेक्शनची बेकादेशीर विक्री केल्याप्रकरणी दोघांना अटक, पुणे पोलिसांची कारवाई

पुणे : रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी दोघांना अटक केली. अटकेत असलेल्या आरोपींमध्ये एका नामांकित हॉस्पिटलच्या नर्सचाही समावेश आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या किमतीत विकताना ही कारवाई करण्यात आली. पृथ्वीराज मुळीक आणि नर्स नीलिमा घोडेकर अशी अटकेत असलेल्या दोघांची नावे आहेत.Pune police arrest two for illegal sale of Remedesivir injection    

गुन्हे शाखेच्या पथकाला भारती विद्यापीठ परिसरात एक व्यक्ती रेमडेसिवीर इंजेक्शन अधिक किमतीत विकत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून अधिक किमती इंजेक्शन देताना पृथ्वीराज मुळीक याला अटक केली. त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्याने हे इंजेक्शन त्याची मैत्रीण असलेल्या नीलिमा घोडेकर हिच्याकडून घेतल्याचे सांगितले. नीलिमा ही वाकड येथील नामांकित हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करते. त्यानंतर पोलिसांनी या दोघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

Img 20210223 wa0156

रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी पुणे पोलिसांनी एक विशेष मोहीम हाती घेतली आहे. याकरिता पोलिसांची दहा विशेष पथके नेमण्यात आली आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याची माहिती नागरिकांना असल्यास त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असं आवाहन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केले आहे.

Img 20210408 wa0012

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये