पुणे महापालिका प्रशासन व सत्ताधारी भाजप पक्ष काेराेनाची परिस्थिती हाताळण्यात अपयशी ; दिपाली धुमाळ यांचा आरोप

पुणे : pune city शहरात काेराेना या संसर्गजन्य राेगाचा प्रादुर्भाव वाढत असून रोज 6 ते 7 हजार काेराेना बाधित रूग्ण आढळून येत आहेत. ही रुग्ण संख्या कमी करण्यासंदर्भात व बाधीत रुग्णांना योग्य सुविधा देण्यात पुणे महापालिका प्रशासन व सत्ताधारी भाजप पक्ष कमी पडत असून त्यांना ही परिस्थिती हाताळण्यात पूर्ण अपयश आल्याचा आरोप विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी केला आहे. Pune municipal administration and ruling BJP party fail to handle corona situation; Allegation of Deepali Dhumal
मागील वर्षी मार्च 2020 मध्ये काेराेनाने पुणे शहरात प्रवेश केला त्यावेळी महापालिकेने सीसीसी सेंटर व मनपाची रूग्णालये सक्षम करणेसाठी प्रयत्न चालू केले हाेते. दरम्यानच्या काळात रूग्णांची संख्या कमी झाली असता महापालिकेने काेराेना संबंधित यंत्रणा बंद करण्यात सुरावात केली. तसेच मागील वर्षी काेराेना बाधित आढळल्यानंतर त्याच्या संपर्कातील लाेकांची तपासणी करणे, त्यांना मनपाच्या क्वारंटाईन सेंटरध्ये नेणे ही यंत्रणा चालू हाेती. पण सध्या काॅन्टॅक्ट ट्रेसिंग करणेची यंत्रणा पूर्णपणे काेलमडली आहे. यामुळे काेराेना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याचे धुमाळ यांनी म्हंटले आहे.

पुणे महापालिकेच्या स्वॅब सेंटरमधून प्रतिदिनी हजाराे रूग्णांचे स्वॅब घेतले जात असून याचे रिपाेर्ट चार ते पाच दिवसानंतर मिळत आहेत. ही बाब अत्यंत गंभीर असून ताेपर्यंत सदर रूग्ण अनेकांना बाधित करत आहे. या प्रकारामुळे संपूर्ण कुटुंंब बाधित होण्याचा धोका वाढला आहे. यामुळे देखील रूग्णांची संख्या वाढत आहे. याध्ये लक्ष घालून तातडीने काम करणारी यंत्रणा उभी करण्याची गरज निर्माण झाली आहे.
काेराेनाची लस देणेसाठी महापालिकेने सेंटर चालू केले आहेत परंतु महापालिकेकडून खाजगी रूग्णालयांना लस देण्यात येत असून महापालिकेतील अधिकारी यासाठी खाजगी रूग्णालयांना पैसे मागतात असा आराेप माजी पदाधिका-यांनी केलेला आहे. पुणे शहरात खाजगी रूग्णालयांमध्ये जे रूग्ण घरी विलगीकरणात राहून बरे हाेवू शकतात, असे रूग्ण देखील पैसे भरून रूग्णालयात दाखल हाेतात, पुणे शहराच्या बाहेरील रूग्ण शहरातील रूग्णालयात दाखल हाेण्याचे प्रमाण वाढलेले असून त्यामुळे गंभीर रुग्णांना बेड उपलब्ध होत नसल्याने यावर महापालिकेचे नियंत्रण राहिलेले नसल्याचे धुमाळ यांच्याकडून सांगितले जात आहे.



पुणे महापालिकेने काेराेनाचे रूग्ण वाढल्यानंतर खाजगी रूग्णालयातील 80 टक्के बेडस ताब्यात घेतले असे जाहिर केले पण त्याचे काय झाले हे सांगितले जात नाही. रूग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची प्रचंड हेळसांड हाेत आहे. महापालिकेचे अधिकारी खाजगी रूग्णालयावर नेमण्यात आले हाेते, त्यांचेकडून देखील कामकाज हाेत नाही, त्यांना कामाची काेणतीही माहिती नसते. महापालिकेच्या वाॅर रूमचा ही नागरीकांना फायदा होताना दिसत नाही.
ही सगळी परिस्थिती सर्व पक्षीय नेत्यांसमोर मांडण्याचे धाडस पालिका प्रशासनात व सत्ताधारी भाजप पक्षात नसल्यानेच सर्व पक्षीय नेत्यांची बैठक घेतली जात नसल्याचा आरोप धुमाळ यांनी केला आहे.



