दिलासादायक : पुण्यात मागील आठ दिवसात नव्या रुग्ण संख्येत घट ; आज सापडले मागील आठ दिवसातील कमी रुग्ण..

पुणे : कोरोना चा वाढत चाललेला प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने लागू केलेल्या कडक निर्बंधाचा म्हणजेच मिनी लॉक डाऊन चा फायदा आता दिसू लागला असून पुण्यात सलग आठ दिवसात नव्या रुग्ण संख्येत घट झाली असून कोरोना मुक्त झालेल्यांची संख्या ही अधिक असल्याचे दिसून येत आहे. Pune saw a decline in the number of new patients in the last eight days; Fewer patients found in last eight days today.
ही बाब पुणे शहरासाठी दिलासादायक असल्याचे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी म्हंटले आहे. याबाबत चे ट्विट करून त्यांनी सलग आठ दिवस नव्या रुग्णसंख्येत घट व कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक आहे. याबाबतची मागील ८ दिवसांची आकडेवारी ही त्यांनी जाहीर केली आहे.

दिनांक/कोरोनामुक्त/नवे रुग्ण
२६ एप्रिल/४३५१/२५३८
२५ एप्रिल/४७५९/४६३१
२४ एप्रिल/४७८९/३९९१
२३ एप्रिल/५६३४/४४६५
२२ एप्रिल/४८५१/४५३९
२१ एप्रिल/६५३०/५५२९
२० एप्रिल/६८०२/५१३८
१९ एप्रिल/६४७३/४५८७
राज्यातही कोरोना बधीतांचा आकडा होतोय कमी
कडक निर्बंधाचा परिणाम राज्यात ही चांगला दिसू लागला आहे. १५ दिवसानंतर नव्या कोरोना बधितांचा आकडा ५० हजाराच्या खाली आला आहे. नागरिकांकडून नियमांचे पालन केले जात आहे. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.



