पुणे शहर

पुण्यातील या तीन मार्गांवर मेट्रोचा विस्तार करण्याची दिपाली धुमाळ यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी..

पुणे : पुणे शहरात सध्या ३ मेट्रो मार्गीकांचे काम चालू आहे. ही कामे चालू असताना शहराच्या इतर भागात
मेट्रो करावी अशी पुणेकरांची भावना आहे. पुणे मनपा हद्दीत २३ गावांचा समावेश झाला असून शहर मोठ्या
प्रमाणात विस्तारित होत आहे. त्यामुळे मेट्रो मार्गांचा विस्तार करण्याची मागणी पुणे महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी केली आहे.Deepali Dhumal’s demand to Ajit Pawar to expand Metro on these three routes in Pune

Img 20210513 wa0015

याबाबतचे पत्र धुमाळ यांच्याकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात आले आहे. शहरातील मुख्य रस्ते व हायवे या लगत मोठमोठ्या टाऊनशिप व आयटी कंपन्या उभ्या राहात असून मध्यमवर्गीय वर्ग मोठ्या प्रमाणात शहरात कायमस्वरूपी राहण्यास आलेला आहे. ते नागरिक मेट्रोचा वापर प्राधान्याने करणार असून शहराचे जीवनमान उंचावणार असल्याचे धुमाळ यांनी म्हंटले आहे.

मेट्रो चा वापर वाढल्यास शहरातील
वाहतूक समस्या, प्रदूषण समस्या व अपघातांची संख्या देखील कमी होणार आहे. त्यामुळे शहराचा वाढता विस्तार पाहता व नागरिकांच्या मागणीचा विचार करता
१) स्वारगेट ते खडकवासला ( सिंहगड रोड)
२) कात्रज ते हिंजवडी
३)कर्वे रोड ते खडकवासला
या तीन मार्गांवर मेट्रोचा विस्तार करण्यात यावा अशी मागणी धुमाळ यांनी केली आहे.

हे तीनही मेट्रो मार्गिकांच्या आजुबाजूस असलेले उपनगरांचे शहरीकरण झाले आहे. तसेच हे मेट्रो मार्ग
केल्यास पुणे शहरात मेट्रोचे जाळे तयार होणार असून नागरिकांना शहराच्या सर्व परिसरात मेट्रोने प्रवास करणे शक्य होणार आहे. तरी वरील तिन्ही मेट्रो मार्गाचा विचार करून सदर ठिकाणी मेट्रो मार्ग करणे विषयी आपल्या स्तरावरून निर्णय घ्यावा अशी विनंती धुमाळ यांनी अजित पवार यांच्याकडे केली आहे.

Fb img 1620720024574

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये