कर्वेनगरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक..

कर्वेनगर : मोरया मित्र मंडळ कर्वेनगर यांच्या वतीने दरवर्षी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज जयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात येत असते मात्र कोरोना चे संकट लक्षात घेऊन मंडळाच्या वतीने छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या मूर्तीला पंचामृत तसेच दुधाने अभिषेक घालून पूजा करून साध्या पद्धतीने जयंती साजरी करण्यात आली. Celebrating Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti by anointing milk in Karvenagar
दरवर्षी जयंती दिवशी संभाजी महाराजांचे पूजन, महाप्रसाद, ढोल ताशा स्थिर वादन करून मानवंदना दिली जाते, तसेच किल्ल्याची प्रतिकृती बनवली जाते , व्याख्यान आणि समाजात नावलौकीक करणाऱ्या विशेष व्यक्तींचे सत्कार केले जातात. परंतु मागील व यावर्षी सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करून प्रशासनाने केलेल्या नियमांचे पालन करत मोरया मित्र मंडळाच्या पाच ते सहा कार्यकर्त्यांनीच संभाजी महाराज जयंती साजरी केली.
पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष विजय पारगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून महाराजांची पूजा करण्यात आली तसेच श्री संभाजी महाराज यांच्या मूर्तीला पंचाअमृताने अभिषेक घालून दुग्ध अभिषेक घालण्यात आला. यावेळी मोरया मित्र मंडळ संस्थापक केदार मारणे, अध्यक्ष सागर शिगवण, उपाध्यक्ष विनायक भरम, मंगेश नवघणे, दादासाहेब आठवले, रोहिदास जाधव, आयुष दळवी , अक्षय केसवड ,गणेश गायकवाड,उपस्थित होते.

दरवर्षीप्रमाणे जयंतीनिमित्त कार्यक्रम घेण्यात येत नसल्याने यावर्षी मंडळाने विविध स्पर्धांचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन केले होते. यामध्ये संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित वकृत्व स्पर्धा ,निबंध स्पर्धा ,चित्रकला स्पर्धा आणि महिलांसाठी आणि त्यांच्या मुलांसाठी ऐतिहासिक वेशभूषा स्पर्धा या स्पर्धांचा समावेश होता. महाराष्ट्रातील विविध भागातील स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला.






