पुणे शहर

पुणे महापालिकेतील सत्ताधारी भाजपला लस खरेदीबाबत केलेल्या घोषणेचा पडला विसर : दिपाली धुमाळ

पुणे : pune city पुणे शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी व येणारी संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी  लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणावर राबवणे हा एकमेव मार्ग दिसत आहे. परंतु शहरात धीम्या गतीने सुरू असलेल्या लसीकरामुळे नागरिकांमध्ये संताप आहे.  पुणे महानगरपालिकेने लस खरेदीचे टेंडर काढणार अशी घोषणा केली होती, पण प्रत्यक्षात काहीच कृती झालेली नाही. त्यामुळे पालिकेतील सत्ताधारी भाजपला लस खरेदीबाबत केलेल्या घोषणेचा विसर पडला असल्याचा आरोप विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी केला आहे. The ruling BJP in the Pune Municipal Corporation forgot about the announcement made about the purchase of vaccines: Deepali Dhumal

धुमाळ यांनी म्हंटले आहे की,  मुंबई महानगरपालिकेने लस खरेदी साठी टेंडर काढलेले आहे. यामध्ये सहभागी कंपन्यांना संपर्क करून महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 चे कलम६७ (३)(क) चा वापर करून पुणे महापालिकेने लस खरेदी करावी अशी मागणी आम्ही पुर्वीच केली आहे.  मुंबई महानगरपालिकेच्या लस खरेदी टेंडर मध्ये ९ कंपन्या सहभागी झाल्या असुन त्या लस पुरवठा करण्यास तयार अश्या बातम्या वृत्तवाहीनीच्या माध्यमातुन येत आहेत.

Img 20210522 wa0203

पुणे महानगरपालिकेतील सत्त्ताधारी भाजपने लस खरेदी करण्यास राज्य शासनाची परवानगी लागते का अशी चर्चा घडवून वेळ घालवला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य शासनाच्या परवानगीची आवश्यकता नाही असे स्पष्ट केल्यानंतरही पुणे महापालिकेकडून पुढे कोणतीच प्रक्रिया करण्यात आल्याचे दिसत नसल्याचे धुमाळ यांनी म्हंटले आहे.

भाजप सत्ताधाऱ्यांना पुणेकरांना लस द्यायची आहे, याचा पुर्ण विसर पडला आहे असे म्हंटले तरी वावगे होणार नाही. पुणे महानगरपालिकेने अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र प्रस्तावित केले असुन लसीकरणाचे पुर्ण नियोजन प्रशासनाने केलेले आहे , परंतु लस अभावी सदर केंद्र चालु झालेली नाहीत. तरी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम६७ (३)(क) चा वापर करून मुंबई महानगरपालिकेच्या लस खरेदी टेंडर मध्ये ९ कंपन्यांना संपर्क करुन पुणेकरांसाठी तातडीने लस खरेदी करावी अशी मागणी धुमाळ यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये