लघुउद्योजकांचा कोविड १९ च्या लसीकरणात अनोमोल वाटा ; अनिल प्लास्टिकने दिली १४९ कर्मचाऱ्यांना लस..

हिंजवडी ( ता.मुळशी ) : हिंजवडी औद्योगिक नगरीमध्ये असणाऱ्या अनिल प्लास्टिक अँड एंटरप्राइसेस या कंपनीमधील १४९ कर्मचाऱ्यांचे लसीकरण कंपनीच्या वतीने करण्यात आले. यामध्ये कंपनी कर्मचाऱ्यांसोबतच कंत्राटी कर्मचारी ,कंपनीचे सुरक्षा रक्षक व हिंजवडी भागातील काही नागरिकांना मोफत लस देण्यात आली. Invaluable contribution of small scale entrepreneurs in vaccination of covid 19; Anil Plastic vaccinated 149 employees
कंपनीने सिम्बायोसिस युनिव्हर्सिटी हॉस्पिटल यांच्या
माध्यमातुन हे मोफत लसीकरण केले. यावेळी कंपनीचे मालक अनिल नाईक, प्राची अनिल नाईक, एच आर मॅनेजर अश्विनी मासाळ, अॅडमिन मॅनेजर राहुल शिवणेकर, मयूर पवार, निखिल भाकरे , पूनम पवार , सुप्रभा जाधव व कंपनीतील सर्व पदाधिकारी उपस्थित होते. अनिल प्लास्टिक अँड एंटरप्रायजेस नेहमीच कर्मचाऱ्यांच्या सुरक्षा, आरोग्य आणि भवितव्याबद्दल सतर्क असते आणि कंपनीने असा उपक्रम राबवून कोरोनाच्या महामारीतून लवकर बाहेर पडण्यासाठी लघुउद्योजकांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.

अनिल प्लास्टिक अँड एंटरप्रायजेस नेहमीच कर्मचाऱ्यांची सुरक्षा आणि आरोग्यकडे गांभीर्याने लक्ष देते हे त्यांनी या लसीकरणातून दाखवून दिले आहे. कोरोनाच्या या कठीण परिस्थितीमध्ये एक सामाजिक कर्तव्य समजून अनिल प्लास्टिक अँड एंटरप्राइसेस या कंपनीने मोफत लसीकरणाची मोहीम राबविल्यामुळे त्यांच्या कर्मचाऱ्यांमध्ये सुरक्षितता आणि सकारात्मकतेची भावना निर्माण झाली आहे.
या कंपनीने कामगार हित जपत कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी कोरोना विमा पॉलीसी व
कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांसाठी १५ दिवसांची पगारी सुट्टी आणि अंतर्गत स्वच्छतेच्या मूलभूत गोष्टींची तरतूद केली त्याचाच एक भाग म्हणून १४९ कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात आले. असेच वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम कंपनी दरवर्षी राबवत असते.



