पुणे शहर

शिवसंग्राम संघटनेच्या वतीने पुणे शहरातील पोलीस स्टेशन्सला  प्रथमोपचार पेटीचे वाटप..

पुणे : pune city शिवसंग्राम संघटना पुणे शहराच्या वतीने पुणे शहरामध्ये मतदार संघानिहाय प्रत्येक मतदार संघातील पोलीस स्टेशन व चौकीमध्ये प्रथमोपचार पेटीचे वाटप करण्यात येत आहे. शिवसंग्राचे संस्थापक अध्यक्ष, आमदार विनायक मेटे vinayak mete यांच्या वाढदिवसानिमित्त संघटनेच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. Distribution of first aid kits to police stations in the pune city on behalf of Shiv Sangram Sanghatana.

शिवाजीनगर, कोथरुड, खडकवासला मतदार संघातील पोलीस स्टेशन व पोलीस चौकी यांना प्रथमोपचार पेटीचे सध्या  वाटप करण्यात आले. यावेळी पुणे शिवसंग्राम संघटनेचे शहराध्यक्ष भरत लगड  सामाजिक न्याय विभागाचे उपाध्यक्ष कल्याण आडागळे पुणे शहर महिला अध्यक्ष कालिंदी गोडांबे, पुणे शहराध्यक्ष- सामाजिक न्याय विभाग विनोद शिंदे, पुणे शहर महिला सरचिटणीस सुजाता ढमाले, पुणे शहर महिला चिटणीस अमिता शेट्टी, शिवाजीनगर मतदार संघ अध्यक्ष- पराग निकम शिवाजीनगर मतदार संघ महिला अध्यक्षा- योगिनी परदेशी आदी उपस्थित होते.

कोणाला कामाच्या ठिकाणी दुखापत झाल्यास प्रथमोपचार पेटीच्या माध्यमातून प्रथमोपचार देणे सोपे जाते व योग्य उपचार मिळेपर्यंत संबधित व्यक्तीला दिलासा मिळतो. त्यामुळे शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील पोलीस स्टेशन व पोलीस चौकी याठिकाणी प्रथमोपचार पेटी देण्याचा उपक्रम राबवला जात असल्याचे संघटनेचे शहराध्यक्ष भरत लगड यांनी सांगितले.

Img 20210707 wa0004

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये