खडकवासला धरण ७२ टक्के भरले. पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस

पुणे : पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या
खडकवासला धरणात गेल्या 24 तासात पावसाने
जोरदार हजेरी लावली आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या २४ तासांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे या धरणसाखळी मधील चारही धरणात तब्बल 2
टीएमसी पाणीसाठा वाढला आहे.(Khadakwasla dam is 72 percent full. Heavy rainfall in the catchment area)
बुधवारी सकाळी या धरणामध्ये 12.23 टीएमसी
पाणीसाठा होता तो शुक्रवारी सकाळी 14.24
टीएमसी झाला आहे. तर खडकवासला धरण 72
टक्के भरले आहे.
मागील 24 तासात खडकवासला धरणात 38
मिमी, पानशेत धरणात 153 मिमी, वरसगाव
धरणात 155 मिमी तर टेमघर धरणाच्या
पाणलोट क्षेत्रात सुमारे 250 मिमी पावसाची नोंद
झाली आहे.
खडकवासला धरण साखळी परिसरातील पर्जन्यमान व धरणसाठा सद्यस्थिती
— PMC Care (@PMCPune) July 22, 2021
दि. २२ जुलै २०२१ सकाळी ६:०० पर्यंत#PMCDisaster#PMCPuneUpdate#PMC#पुणे_महानगरपालिका pic.twitter.com/xFa6ytW1Jo




























