पुणे शहर

शिवणे इंडस्ट्रियल असोसिएशनच्या लसीकरण मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद..

पुणे : शिवणे इंडस्ट्रीयल असोसिएशनचे अध्यक्ष व माजी स्वीकृत नगरसेवक संजय भोर आणि नगरसेविका वृषाली चौधरी यांच्या पुढाकाराने पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून आयोजित कोविड 19 च्या विशेष लसीकरण मोहिमेला बुधवारी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सुमारे सव्वा दोनशेहून अधिक कर्मचारी व नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेतला.

शिवणे येथील दांगट इंडस्ट्रियल इस्टेटमधील भोर इंडस्ट्रीज कंपनीच्या आवारात हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यासाठी सकाळपासून कर्मचाऱ्यांच्या रांगा लागल्या होत्या. भोर इंडस्ट्रीजचे संचालक शुभम भोर व त्यांचे सहकारी या मोहिमेत सहभागी होणाऱ्यांना मार्गदर्शन करीत होते.

या शिबिरासाठी महापालिकेच्या वतीने कोव्हिशिल्ड लसीचे डोस उपलब्ध करून दिले होते. कोव्हिड पासून सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणावर लसीकरण होणे गरजेचे आहे, हे ओळखून शिवणे इंडस्ट्रियल असोसिएशनच्या वतीने गेल्या काही महिन्यांपासून जनजागृती मोहिम राबविण्यात येत आहे. पंधरा दिवसांपूर्वी आयोजित केलेल्या अशाच शिबिरातही अडीचशेहून अधिक कामगारांचे लसीकरण करण्यात आले होते, असे असोसिएशनचे अध्यक्ष संजय भोर यांनी सांगितले.

Paperdesign

कोव्हिड विरोधातील या लढ्यात असोसिएशनचे सक्रीयपणे आपला सहभाग नोंदविला असून यापूर्वीही रॅपिड अँटिजेन टेस्ट व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. परिसरातील उद्योजकांचेही त्यासाठी मोलाचे सहकार्य होत असल्याचे भोर यांनी स्पष्ट केले.

Img 20210818 wa0002

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये