महाराष्ट्र

प्रविण दरेकरांची राष्ट्रवादी काँग्रेसवर आक्षेपार्ह भाषेत टीका ; माफी मागा अन्यथा : राष्ट्रवादी आक्रमक

पुणे : शिरूर येथे बोलताना विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची जीभ घसरल्याचं पुढं आल आहे.  सुप्रसिद्ध लावणी कलावंत सुरेखा पुणेकर आणि शांताबाई फेम गायक संजय लोंढे यांच्यासह काही कलाकार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळतेय. या प्रवेशाबाबत बोलताना प्रवीण दरेकर यांची जीभ घसरली असून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर आक्षेपार्ह भाषेत टीका केली असून  त्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आक्रमक झाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसला गरीब लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष
द्यायला वेळ नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा ‘रंगलेल्या
गालाचा’ मुका घेणारा पक्ष आहे, अशी टीका दरेकर
यांनी केलीय. त्यावरुन आता राजकीय वातावरण तपण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

राष्ट्रवादी महिला काँग्रेस अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दरेकरांवर जोरदार हल्ला चढवला आहे. दरेकर यांनी माफी मागावी,  अन्यथा महिलांचा अपमान करणाऱ्यांचे आम्ही थोबाड आणि गाल रंगवू शकतो असे चाकणकर यांनी म्हंटले आहे.

Img 20210913 wa0011 1

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये