कोथरुड

एरंडवणेतील गणेशोत्सव मंडळांनी एकत्र येत गौरी सजावट स्पर्धेचा अभिनव उपक्रम राबविला.

कोथरूड : एरंडवणे भागातील देशप्रेमी मित्र मंडळ,राजबाग तरूण मंडळ,श्री शनी मारूती बाल गणेश मंडळ,अखिल गणेश नगर मंडळ, बाल तरूण मंडळ, लोकमान्य मित्र मंडळ, विर चिरंजीव संजयगांधी तरूण मंडळ व गणेश नगर मंडळ या प्रमुख मंडळांचे पदाधिकारी मंदार बलकवडे, सुरेखा होले,मंगेश मते,सचिन पवार,समीर येणपुरे,महेश सुपेकर,गणेश दळवी,दिपक विश्वकर्मा,मनोज बलकवडे यांनी एकत्र येवून गणेश नगर ओटा वसाहत,संजय गांधी नगर, पौडफाटा, नेहरू वसाहत, १० चाळ, ७ चाळ, ३ चाळ गणेश नगर या भागातील रहिवाशांसाठी पर्यावरण पुरक गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात केले होते.

Img 20210914 wa0005

३०० कुटूंबांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. विविध प्रकारे केलेली आकर्षक सजावट व आरास परिक्षकांना भुरळ घालत होते. सदर स्पर्धेचे परिक्षण राज तांबोळी, प्रा.अनुराधा एडके, डॉ.अनुश्री द्रविड,तनुजा कुलकर्णी, शीला निकम यांनी केले. वस्ती विभागात प्रत्येकि ४ नंबर काढून एकूण २४ बक्षिसे देण्यात येणार आहेत, सहभागी सर्व स्पर्धकांना आकर्षक भेट वस्तू सुंदरा मनामध्ये भरली फेम (नंदिनी) अभिनेत्री अदिती द्रविड यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात येणार आहे अशी माहिती मंदार बलकवडे यांनी दिली

Img 20210913 wa0000

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये