कर्वेनगर व सनसिटी-सिंहगड रोडला जोडणाऱ्या मुठा नदीवरील ३० मीटर रुंदीच्या पुलाचा प्रश्न मार्गी…

पुणे : pune city, karvenagar कर्वेनगर व सनसिटी सिहंगड रोडला जोडणाऱ्या उड्डाणपुलाचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून या पुलासाठी बाधित होणारी १२ गुंठे जागा कर्वेनगर मधील दुधाने परिवाराकडून महानगरपालिकेला प्राथमिक ताबेयादी करुण पुढील प्रक्रिया करण्याकरिता परवानगी देण्यात आली आहे. प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि संबंधित शेतकरी यांच्या योग्य संवादामुळे कर्वेनगर वारजे आणि सनसिटी सिंहगड रोड परिसरातील नागरिकांना फायद्याच्या ठरणाऱ्या पुलाचा मोठा प्रश्न मार्गी लागला आहे. The problem of the 30 meter wide bridge over the river connecting Karvenagar and Suncity-Sinhagad road is solved …
शहर अभियंता प्रशांत वाघमारे आणि दुधाने परिवारतील प्रमुख व्यक्तींची आज मनपा कार्यालयात बैठक संपन्न झाली. कर्वेनगरच्या विकासाला प्रथम प्रधान्य देत जमीन देण्याचा निर्णय घेतला असल्याचे दुधाने परिवाराकडून यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे. यावेळी नगरसेविका लक्ष्मी दुधाने, कोंडीराम दुधाने, माणिक दुधाने, विजय दुधाने, स्वप्निल दुधाने आदी उपस्थित होते.

महानगरपालिकेत प्रशांत वाघमारे यांच्या कार्यालयात संपूर्ण दुधाने परिवाराचे सदस्य उपस्थित राहून त्यांनी बारा गुंठ्याच्या बाधित क्षेत्राची प्राथमिक ताबेयादी देऊन पुलाच्या कामाला हिरवा कंदील दिला, त्याबद्दल सर्व दुधाने परिवाराचे महानगपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आभार व्यक्त केले. तसेच, या पुलाच्या संदर्भात वेळोवेळी प्रशांत वाघमारे यांनी परिवाराशी सतत सकारात्मक चर्चा करून हा विषय मार्गी लावला त्याबद्दल दुधाने परिवाराच्या वतीने वाघमारे यांचा सत्कार करण्यात आला.
कर्वेनगर ते सनसिटी-सिंहगड रोड या दोन्ही उपनगरात येण्या-जाण्यासाठी या दोन्ही भागातील नागरीकांना अर्धा तासाचा कालावधी लागतो, तो या नदीवर होणाऱ्या पुलामुळे पाच मिनिटावार येणार आहे. इतकी जवळ ही दोन्ही उपनगरे आता जोडली जाणार आहेत. तसेच कर्वेनगर व सिंहगड रोड-सनसिटी परिसरातील वाहतुकीचा प्रश्न सुटणार असल्याचे नगरसेविका लक्ष्मी दुधाने यांनी सांगितले.






