पुणे शहर

जिजामाता फाऊंडेशन आणि वात्सल्य फाऊंडेशनच्या वतीने केळेवाडीतील विद्यार्थिनींना स्कूल ड्रेसचे वाटप

पुणे : भाजप प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वतीने प्रभाग क्रमांक ११ मधील  वस्ती भागात राहणाऱ्या वय वर्षे १२ ते २० च्या शालेय विद्यार्थीनींना ड्रेस मटेरिअल (शिलाईसह) मोफत वाटप करण्यात आले.

यावेळी भाजप कोथरूड मतदारसंघ अध्यक्ष पुनीत जोशी अनूराधा येडके, अनिता तलाठी, सुरेखा जगताप अभिजित राऊत संतोष घारे,कमलाकर भोंडे काका, वृषभ मोकाटे,नचिकेत कुलकर्णी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आयोजन जिजामाता फाऊंडेशन व वात्सल्य फाऊंडेशन आणि स्थानिक नगरसेविका छाया अजय मारणे यांनी केले होते. मारणे म्हणाल्या, कोरोना संकटामुळे सर्वाधिक वस्ती विभागांतील नागरिकांवर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. त्यामूळे समाजातील या घटकाला मदत करण्याच्या उद्देशाने  आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या वतीने वस्ती विभागांतील शालेय विद्यार्थिनींना ड्रेस चे मोफत वाटप करण्यात आले.

Img 20211022 wa0034

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये