पुणे शहर

वेतनच नसल्याने समाविष्ट गावातील महापालिका कर्मचारी कशी करणार दिवाळी : दिपाली धुमाळ यांचा प्रश्न..

पुणे : pune city पुणे महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या २३ ग्रामपंचायतीमधील कर्मचारी वर्गाचे वेतन गेली चार महिन्यापासुन प्रलंबित असल्याने या कर्मचाऱ्यांवर दिवाळी सणात उपासमारीची वेळ आली आहे. सत्ताधारी भाजप व पालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे हा प्रकार घडत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी केला आहे.

दि.३०/०६/२०२१ रोजी तत्कालीन २३ ग्रामपंचायती महापालिकेत समाविष्ट करण्यात आल्या. त्याबरोबरच ग्रामपंचायतीचे कर्मचारी हे पालिकेचे कर्मचारी झाले. परंतु आता चार महिने झाले तरी या कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात  आलेले नाही. समोर कोरोनामुळे निर्माण झालेले संकट व आता दिवाळी सण सुरू होत असताना बोनस तर सोडा पण वेतनच नसल्याने हे कर्मचारी हवालदिल झाले आहेत. सण कसा साजरा करायचा, दैनंदिन खर्च कसा भागवायचा, मुलांची शैक्षणिक फी कशी भरायची, घराचे हफ्ते कसे भरायचे असे प्रश्न त्यांच्यासमोर आहेत.

Screenshot 2021 10 26 15 21 45 02

या कर्मचाऱ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखिची झाली आहे. या कर्मचाऱ्यांना या संकटातून बाहेर काढणे अत्यंत गरजेचे आहे पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. या कर्मचाऱ्यांना दैनंदिन जीवन जगण्यासाठी सद्यस्थितीतमध्ये तत्कालीन ग्रामपंतीकडे कार्यरत असताना जे वेतन होते तेच वेतन दि.३०/०६/२०२१ रोजी पासुन तातडीने सुरू करून देण्यात यावे अशी मागणी दिपाली धुमाळ यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

Img 20211028 wa0242
Img 20211028 wa0117
Img 20211029 wa0160
Img 20211027 wa0188
Img 20211101 wa0004 1
Img 20211101 wa0232

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये