पुणे शहर

अधिकाऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सत्ताधाऱ्यांचा पुणे महापालिकेची निवडणुक पुढे ढकलण्याचा प्रयत्न ?

पुणे : पुणे महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना कच्चा आराखडा जाहीर करण्यासाठी ३० नोव्हेंबर ही अंतिम तारीख असताना प्रशासनाच्या वतीने प्रभाग रचनेच्या कामासाठी पंधरा दिवसांची मुदत वाढवून देण्याची मागणी केली आहे. हे राजकीय षडयंत्र असून अधिकाऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सत्ताधारी निवडणुक पुढे ढकलण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप माजी विरोधी पक्षनेते ‘आपले पुणे’च्या उज्वल केसकर यांनी केला आहे.

केसकर म्हणाले, आज पुण्यामध्ये विविध प्रसारमाध्यमामध्ये आलेल्या बातमी प्रमाणे पुणे महानगरपालिका विहित मुदतीत म्हणजे 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत प्रभाग रचना पूर्ण करू शकत नाही त्यामुळे पंधरा दिवसाची मुदत मागितली आहे खरं म्हणजे हे एक राजकीय षड्यंत्र आहे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सत्ताधाऱ्यांना सध्याचे वातावरण निवडणुकीसाठी अनुकूल नाही म्हणून निवडणूक पुढे ढकलण्यासाठी ही केलेली एक चाल आहे असे आमचे म्हणणे आहे

Img 20211105 wa0169

वास्तविक निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेचा नीट अभ्यास केल्यास पुणे महानगरपालिकेकडे असलेले अद्ययावत तंत्रज्ञान तंत्रज्ञ याचा विचार केला असता, हे काम विहित दिवसांमध्ये पूर्ण होऊ शकते असे असताना आम्हाला हे काम विहित मुदतीत पूर्ण करता येणार नाही असे सांगणे म्हणजे कुठेतरी राजकीय दबाव आहे असे स्पष्ट होते.

आम्ही घेतलेल्या माहितीनुसार महा विकास आघाडीतील घटक पक्ष “एकत्र न येता” प्रत्येक जण आपल्याला सोयीची कुठली “प्रभाग” रचना आहे त्याचे “नकाशे” बनवून ते अधिकाऱ्यांना देत आहेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण दिलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये कसे बसवायचे असा संभ्रम या अधिकाऱ्यांच्या मनामध्ये आहे असे कळते एक पक्ष ज्यांच्याकडे पालक मंत्री पद आहे दुसरा पक्ष ज्यांच्याकडे नगर विकास खाते आहे आणि तिसरा पक्ष आमच्या पाठिंब्यामुळेच हे सरकार आहे असे सांगतात त्यामुळे नेमकं कुणाचं ऐकायचं असा प्रश्न महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना पडला आहे आणि म्हणून यातून मार्ग काढण्यासाठी मुदतवाढ मागून घ्यायची आणि कुणाचाच वाईटपणा घ्यायचा नाही असे त्यांचे धोरण दिसते.

वास्तविक महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी हे काम गुप्तपणे केले पाहिजे ते “कुणाला कळता” कामा नये अशा आपल्या स्पष्ट सूचना असताना हा “गोंधळ” उडलेला आहे.आम्ही आपल्या गाईडलाईन प्रमाणे प्रभाग रचना कशी होऊ शकेल याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे.

जर आमच्या सारख्या तांत्रिक ज्ञान असणाऱ्या सामान्य नागरिकाला ही सगळी रचना चार पाच दिवसांमध्ये करता येऊ शकते हा विश्वास वाटतो, तर ज्यांच्याकडे याचं नॉलेज आहे, तंत्रज्ञआहेत, तंत्रज्ञान आहे, त्यांना हा कालावधी का पुरत नाही हा प्रश्न आमच्या मनामध्ये आहे. यानिमित्ताने आमची आपणाकडे मागणी आहे की आपण “राज्य निवडणूक आयोगाचा प्रतिनिधी” म्हणून एखाद्या नि:पक्ष अधिकाऱ्याची नेमणूक करावी म्हणजे आपल्या लक्षात येईल की हे काम करणे त्यांना फार अवघड का वाटते.

आम्ही आपल्या सूचनेप्रमाणे मार्गदर्शक तत्त्वाचा अवलंब करून एक प्रभाग रचनेचा नकाशा आपल्या कार्यालयात सादर करू. मुदतवाढ देऊन निवडणुका पुढे ढकलण्याच्या प्रयत्नांना कृपया आपण वेळीच ओळखून याबाबत त्वरित पावले उचलून, योग्य ती कारवाई करून वेळेतच निवडणुका होतील, याची खबरदारी घ्यावी आणि राज्यघटनेने आपणाकडे सोपवलेले दायित्व आपण योग्य रीतीने निभवावे अशी आमची आपणास विनंती आहे आपण वेळ दिल्यास आम्ही आपल्याकडे आमच्या बुद्धीप्रमाणे तसेच आपल्या सूचनेचे मार्गदर्शक सूचनाचे पालन करून केलेला नकाशा सादर करू. परंतु पुणे महानगर पालिके सारख्या सर्व तंत्रज्ञानाने युक्त असलेल्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला हे काम वेळेत करता येणार नाही हे सांगणे खरोखर चुकीचे वाटते.वेळेवर निवडणुका होतील यासाठीची पावले उचलायची ती आपण उचलावीत अशी मागणी केसकर आणि सुहास कुलकर्णी यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये