पुणे शहर

कर्वे रस्त्यावरील नळस्टॉप चौकातील उड्डाणपुलाचे मेट्रो सोबतच लोकार्पण होणार…

पुणे : कोथरूड- कर्वे रस्त्यावरील नळस्टॉप चौकात मेट्रो खांबावर उड्डाणपुल बांधण्यात आला आहे. या उड्डाण पुलाचे उद्घाटनही मेट्रो सोबतच केले जाणार आहे. सातशे मीटरचा शहरातील पहिलाच दुहेरी उड्डाण पूल आहे. उड्डाणपूल व त्यावर मेट्रो अशी दुहेरी रचना आहे. मेट्रोच्या खांबांच्या मध्यभागातून बरोबर दोन्ही बाजूला हा पूल विभागला आहे. त्यांची लांबी ७०० मीटर तर रुंदी १५ मीटर आहे . या उड्डाण पुलाचा मध्यभाग नळस्टॉप चौकात आहे. तर पुढे एसएनडीटी तर मागे पेट्रोल पंपाच्या जवळ हा उड्डाण पूल सुरु होतो. अशी माहिती पुणे मेट्रो (Punemetro) च्या वतीने देण्यात आली आहे.

या पुलाच्या मध्यभागी मेट्रो असेल. तर दोन्ही बाजूला दोन-दोन म्हणजेच एकूण चार मार्ग असणार आहेत. त्यात एका बाजूने दुचाकी वाहनासाठी व चारचाकी वाहनासाठी या जागा असणार आहेत. बसेस मात्र नियमित रस्त्यावरूनच धावणार आहेत.

Img 20211105 wa0169

शहरातील नळस्टॉप चौक हा कायम रहदारी असलेला चौक आहे . येथे वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणात होत असते. या उड्डाण पूलमुळे सातत्याने निर्माण होणारी वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास मदत होणार आहे. ज्या वाहनांना आजूबाजूच्या गल्ली बोळात जायचे नाही त्यांना या उड्डाण पुलावरुन सरळ पुढे जात येणार आहे.

वनाज ते गरवारे हा मेट्रोचा मार्ग प्राधान्याने डिसेंबर ते जानेवारी २०२२ दरम्यान सुरु होत आहे. त्याचा दरम्यान या उड्डाण पुलाचा लोकार्पण सोहळा करण्याचा महापालिकेचा विचार आहे. मेट्रोच्या खांबाच्या वर असणारा हा पूल पुण्याची नवीन ओळख निर्माण करणारा आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये