पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी मोठी माहिती..

पुणे: टीईटी परीक्षेत 2018 मध्ये ही घोटाळा झाला होता, अशी माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे. आतासारखाच घोळ त्यावेळी झाला होता. 15 जुलै 2018 ला परीक्षा झाली तर निकाल 12 ऑक्टोबरला निकाल लागला होता. त्यावेळी परीक्षा नियंत्रक डेरे हे होते त्यांना अटक केली आहे. प्राथमिक अंदाजानुसार 500 लोकांच्या प्रमाणपत्रासंदर्भात माहिती मिळालीय. हा सर्व प्रकार 5 कोटी रुपयांपर्यंतचा असेल, असा अंदाज आहे असे त्यांनी सांगितले आहे.
2018 ला देखील या प्रकरणी तक्रार झाली होती. मात्र प्रकरण लॉजिकल एंडला गेले नव्हते. सुखदेव डेरे त्यावेळी प्रमुख होते. त्यानंतर तुकाराम सुपेकडे काही वेळ चार्ज होता. सुखदेव डेरे आणि आश्विन कुमारला अटक केली आहे. आता झालेल्या तक्रारीचा तपास करताना हे समोर आलं आहे. काल आम्ही रात्री सायबर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केला आहे. आम्ही ज्यांना अटक केली आहे त्यातून लॅपटॉप मिळाला त्यातून ही लिंक पुढे आली आहे. तुकाराम सुपे आणि प्रीतिश देशमुख यांच्याकडे केलेल्या तपासात हे समोर आलं आहे.
प्राथमिक अंदाजानुसार 500 लोकांच्या प्रमाणपत्रासंदर्भात माहिती मिळालीय. हा सर्व प्रकार पाच कोटी रुपयांपर्यंतचा असेल, असा अंदाज आहे. सुखदेव डेरे दोन ते तीन वर्ष निवृत्त झालेले होते. 2018 च्या प्रकरणासंदर्भात आमच्याकडे प्राथमिक माहिती आहे, असं अमिताभ गुप्ता म्हणाले आहेत.
आरोग्य भरतीसंदर्भात संजय सानपला अटक केली होती. संजय सानप हा दलाल म्हणून काम करत होता. भरपूर दलाल आहेत आम्ही चौकशी करत आहोत. सर्व गोष्टी सांगू शकत नाही, कोर्टाला माहिती देऊ, असं अमिताभ गुप्ता म्हणाले.




