कोथरुड

कोथरुडमधील सौदामिनी सोसायटीजवळील रस्त्याचे ॐ दत्त श्री ठाकूर महाराज पथ असे नामकरण..

कोथरुड : pune city नगरसेविका अल्पना वरपे यांच्या संकल्पनेतून  कोथरूड डेपो-बावधन या प्रभाग क्रमांक १० मधील उजवी भुसारी कॉलनीतील सौदामिनी सोसायटीजवळील ॐ दत्त मंदिर येथील रस्त्याला *ॐ दत्त श्री ठाकूर महाराज पथ असे नाव देण्यात आले असून त्या नामफलकाचे उद्घाटन खडकवासला मतदार संघाचे आमदार भिमराव तापकीर यांच्या हस्ते व मामी महाराज यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी बोलताना तापकीर म्हणाले की, समाजासाठी व धर्मासाठी कार्य करणार्‍या अशा थोर व्यक्तिमत्वाचे नाव सदर पथाला देण्यात आल्या बद्दल समाधान वाटते.   नगरसेवकांनी विविध विकास कामांबरोबरच असे समाज मनावर प्रभाव पाडणारे कार्यक्रम करणे आवश्यक आहे.  

अल्पना वरपे म्हणाल्या, अध्यात्म क्षेत्रात प्रचंड काम असणारे व निस्सिम दत्तभक्त व ॐ दत्त मंदिराचे संस्थापक श्री.ठाकूर महाराजांचे नामकरणाचा कार्यक्रम श्री.दत्त जयंतीच्याच दिवशी करता आला हे आमचे भाग्यच आहे. यावेळी परिसरात करण्यात आलेल्या व चालू असलेल्या विकासकामांची माहिती त्यांनी दिली.

Whatsapp image 2021 11 23 at 2. 46. 54 pm
Img 20211129 wa0128

यावेळी नगरसेवक दिलीप वेडेपाटील, किरण दगडेपाटील, नगरसेविका डाॅ.श्रद्धा प्रभुणे-पाठक, अॅड.गणेश वरपे, सचिन बदक, स्विकृत सदस्य वैभव मुरकुटे, बाळासाहेब टेमकर, प्रभाग अध्यक्ष सागर कडू, कैलास मोहोळ, राजेश कुलकर्णी, अक्षय ढाकणे, गणेश कोकाटे, प्रदिप जोरी, सुरेंद्र कंधारे, भरत मराठे,bराजेश मनगिरे, कृष्णा भंडारी, विनिल मरे, तुषार धामंदे, रूपेश भोसले, राजीव निगडीकर, अभिजीत धुमाळ, अजय भरेकर, विनायक वरपे, संतोष महाजन, सिद्धेश कवडे, अजित शिगवण, अमोल शिर्के, रोहित जाधव, ओंकार शिंदे आदि पदाधिकारी तसेच सोनिया महाजन, सुप्रिया माझिरे, जान्हवी जोशी, अंजली पाटील, सुहासिनी शिराढोणकर, शिल्पा कवडे, आदि भाजपा महिला पदाधिकारी तसेच  दत्तात्रय चोंधे,राजेंद्रजी भोसले साहेब, अॅड.ज्ञानेश्वर पानसरे, राजाभाऊ जोरी, तानाजी भरेकर, तात्या कुंबरे, बाळासाहेब शेडगे, पळसकर काका, कदमबांडे साहेब, योगेश कदम, साहेबराव मोरे आदि मान्यवर व ॐ दत्त परिवार  परिसरातिल नागरिक व भाजपा पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये