पुणे शहर

पुणे मेट्रोकडून नदीपात्रात राडारोडा ; खासदार वंदना चव्हाण यांच्याकडून अलंकार पोलिसांकडे तक्रार

पुणे : पुणे मेट्रोच्यावतीने एरंडवणे, कर्वेनगर भागात म्हात्रे पुल डीपी रस्त्यालगत नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात राडारोडा टाकला जात असल्याची गंभीर घटना खासदार वंदना चव्हाण यांनी उघडकीस आणली असून मेट्रो विरोधात अलंकार पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे.

खासदार वंदना चव्हाण म्हणाल्या, मुठा नदीच्या रेड लाइन आणि ब्ल्यू लाईन मध्ये पुणे मेट्रो कडून ट्रक मधून राडारोडा टाकण्यात येत आहे.पर्यावरणवादी कार्यकर्ते सारंग यादवाडकर यांनी काल हे ट्रक मधून राडारोडा टाकत असतानाचे फोटो देखील काढले आहेत.आणि महापालिकेला कळवले आहे. महापालिकेने ट्रक ताब्यात घेतले आहेत.पुणे मेट्रो सारख्या जबाबदार संस्थेने अशाप्रकारे नदीपात्रात राडारोडा टाकणे गंभीर घटना आहे.
यावर पोलिसांकडून कायदेशीर कारवाई करण्यात यावी .अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे.

Screenshot 20211227 1402344603556305344739789

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये