पुणे शहर

पुण्यातील या भागांतील पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार आहे.

देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी बंद राहणार पाणीपुरवठा

पुणे : गुरुवार दिनांक ०६/०१/२०२२ रोजी पर्वती जलकेंद्र, वडगाव जलकेंद्र व लष्कर जलकेंद्राचे अखत्यारीतील पर्वती LLR टाकीवरील व रामटेकडी टाकीवरील विद्युत/पंपिंग विषयक व स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम असल्यामुळे, अत्यावश्यक देखभाल दुरुस्तीचे कामांसाठी उपरोक्त पंपिंगचे अखत्यारीतील पुणे शहरातील काही भागाचा पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवार दिनांक ०७/०१/२०२२ रोजी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.

दि. ०६/०१/२०२२ रोजी दुपारी १२ पासून दि. ०७/०१/२०२२ दुपारी १२ पर्यंत पर्वती जलकेंद्राचे अखत्यारीत पर्वती एल.एल.आर टाकीचे मुख्य पाण्याची लाईन व नव्याने टाकण्यात
आलेल्या लाईनला जोडण्यासाठीचे कामामुळे पाणीपुरवठा बंद राहणार आहे व दि. ०८/०१/२०२२ रोजी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे असे आवाहन पुणे महापालिका प्रशासनाने केले आहे.

पाणी पुरवठा बंद असणारा भाग :-
वडगाव जलकेंद्र परिसर :- दि. ०६/०१/२०२२ रोजी सिगड रोड वरील हिंगणे, आनंदनगर,वडगाव, धायरी, आंबेगावपठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रुक इत्यादी.

पर्वती (LLR) जलकेंद्र परिसर :- शहरातील सर्व पेठा (दि. ०६/०१/२०२२ रोजी दुपारीपासून ते ते शुक्रवार दि. ०७/०१/२०२२ रोजी दुपारपर्यंत) दत्तवाडी परिसर, राजेंद्र नगर, लोकमान्य नगर, डेक्कन परिसर, शिवाजीनगर परिसर (स्वारगेट, पर्वती दर्शन, मुकुंद नगर, भवानी पेठ व नाना पेठ येथील भागांना कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.)

लष्कर जलकेंद्र परिसर :- दि. ०६/०१/२०२२ रोजी GE साउथ, GE नॉर्थ, पुणे कॅन्टोनमेंटचा हद्दीचा सर्व भाग, जांभूळकर मळा, रामटेकडी, हेवन पार्क, आशिर्वाद पार्क, हडपसर, सय्यदनगर,
काळेपडळ, महंमदवाडी, ससाणेनगर, फुरसुंगी, उरुळी देवाची, मुंढवा, केशवनगर, सोलापूर रोड, गोंधळेनगर, सातववाडी, आकाशवाणी, वैदुवाडी, साडेसतरा नळी घोरपडी गाव व परिसर, वानवडी गाव, बी.टी. कवडे रोड, उदय बाग, कवडे मळा, मगरपट्टा, हांडेवाडी रोड, मंतरवाडी, सोलापूर रोडची डोबडवाडी, सोपानबाग तसेच उत्तर बाजूस फातिमा नगर, एस. व्ही नगर परिसर, सेंट पॅट्रिक टाऊन, शेवकर वस्ती इत्यादी.

Screenshot 20211227 1402344603556305344739789

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये