
पुणे : कोरोनाबाधित (कोविड-१९) रुग्ण वाढीचा दर वाढलेला असून त्यामुळे कोरोना विषाणूची तिसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. सद्यस्थितीमध्ये वारजे कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील खालीलठिकाणी कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याचे क्षेत्रिय वैद्यकीय अधिकारी यांनी संदर्भ क्र ५ अन्वये कळविले आहे. अशी माहिती पुणे महापालिका प्रशासनाने दिली आहे.
सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्राचे नाव
१. परिमल अपार्टमेंट, मनमोहन सोसायटी जवळ, कर्वेनगर, पुणे
२.अमृत अपार्टमेंट, प्रभात रोड, एरंडवणे
३. स्वागत अपार्टमेंट, सहवास सोसायटी कर्वेनगर
४. करिष्मा सोसायटी, कर्वे रोड

तरी कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी उपरोक्त सदरचा परिसर हा सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र (Micro Containment Zone) म्हणून घोषित करण्यात येत आहे.
वरील परिसर व त्याच्या आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी खालील सुचनांचे पालन करणे आवश्यक आहे.
१) इतर नागरिकांनी त्यांच्या आवारात अथवा घरी भेट देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे पल्स ऑक्सिमीटर आणि थर्मल डिटेक्टरच्या साहाय्याने तपासणी सदर सोसायटीने करावी. कोविडसाठी पल्स ऑक्सिमीटर तपासणी ही दिशादर्शक आहे. ज्या व्यक्तीची.ओ-२ सॅच्युरेशन लेव्हल ही ९४ च्या खाली असल्यास त्यास त्वरित पुढील तपासणीकरिता महापालिकेची रुग्णालये अथवा खाजगी डॉक्टर यांचेमार्फत तपासणी करून घेणेबाबतची सुचना देण्यात यावी.
२) याठिकाणी राहणाऱ्या ज्येष्ठ व्यक्ती । १० वर्षाखालील मुले / आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्ती यांची पल्स ऑक्सिमीटरद्वारे तपासणी करून त्यांची दैनंदिन नोंद ठेवण्यात यावी.






