पुणे शहर
पुण्यात स्वबळावर लढण्याची काँग्रेसची तयारी सुरू

पुणे :महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कळविल्यानंतर पुण्यातील काँग्रेस पक्ष त्या दृष्टीने तयारीला लागला आहे.
निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांची नांवे, बायोडाटा जमवावा, अशा सूचना पटोले यांनी दिल्या आहेत. पटोले यांच्या पत्राला अनुकूल उत्तर शहर काँग्रेसने दिले आहे. पक्षाच्या अल्पसंख्यांक विभागाचे पुणे शहराचे अध्यक्ष यासीन शेख यांनी शनिवार, दि. १५ रोजी बैठक बोलाविली आहे. इच्छुकांना बैठकीसाठी आमंत्रित केले असून प्रत्येकाने प्रभाग क्रमांकासह बायोडाटाही आणावा, असे सूचनेत म्हटले आहे. अशाच पद्धतीने काँग्रेसच्या विविध आघाड्यांच्या बैठका होतील.







