पुणे शहर

भारतीय क्रिकेट मधील उभरता सितारा राजवर्धन हंगरगेकर याचा भारतीय जनता युवा मोर्चा कोथरूड मतदार संघाच्या वतीने सत्कार…

कोथरुड : भारतीय क्रिकेटच्या क्षितीजावर धमाकेदार एंट्री करणाऱ्या मऱ्हाटमोळ्या राजवर्धन हंगरगेकर याचा भारतीय जनता युवा मोर्चा कोथरूड मतदार संघाच्या  वतीने सत्कार करण्यात आला.

मुळचा तुळजापूरचा असणारा राजवर्धन हंगरगेकर हा कोथरुडमध्ये राहत असल्याने त्याचा भारतीय जनता मोर्चा कोथरूड मतदार संघाच्या वतीने सत्कार करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी भाजयुमोचे मतदार संघाचे अध्यक्ष दुष्यंत मोहोळ, दिनेश माथवड व पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

राजवर्धन हंगरगेकर याची अंडर 19 क्रिकेट वल्डकपचा हिरो अशी त्याची आता नव्याने ओळख निर्माण झाली आहे, दस्तरखुद्द विराट कोहलीने अंतिम सामन्यापुर्वी राजवर्धन सोबत व्हिडीओ कॉलवरती संपर्क साधत राजवर्धनला मार्गदर्शन केले होते.

राजवर्धन अंडर 19 वर्ल्डकप विजेता असला तरी इथेपर्यंतचा प्रवास मात्र संघर्षमय आहे. वडीलांचे दोन वर्षापूर्वी कोरोनाने निधन झाले आणि राजवर्धन कोलमडून पडला अशा परिस्थितीत राजवर्धनला मानसिक आधार दिला त्याचे प्रशिक्षक, मित्र व त्याच्या आईने, वडीलांच्या निधनानंतर स्वतःला सावरत राजवर्धन क्रिकेटचा सराव करण्यासाठी प्रयत्न करत होता, पण लॉकडाउन मध्ये पुण्यात सर्वकाही बंद असल्याने राजवर्धनने थेट तुळजापूर गाठत शेतात मध्ये पिच बनवीले. तिथे आपल्या सरावाला सुरुवात केली आणि आज तो भारतीय क्रिकेटमधील एक उगवता तारा बनला आहे. आता त्याची आय पी एल मधील चेन्नई सुपर किंग्ज या संघात निवड करण्यात आली आहे.

Screenshot 2022 01 29 09 52 08 45

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये