महाराष्ट्र

नवाब मलिक यांची प्रकृती बिघडली; उपचारासाठी जे.जे. रुग्णालयात दाखल

मुंबई : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नवाब मलिक यांना पोटदुखीची तक्रार असल्याचे सांगण्यात येत आहे.

नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी वैद्यकीय तपासणीसाठी जे.जे. रुग्णालयात आणले होते. वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर नवाब मलिक यांना अर्धा तासात पुन्हा ईडीच्या कार्यालयात नेणे, अपेक्षित होते. मात्र, तीन ते चार तास उलटूनही नवाब मलिक यांना जे.जे. रुग्णालयातून बाहेर नेण्यात आलेले नाही. याची अधिक चौकशी केली असता नवाब मलिक यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली. ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. न्यायालयाने यापूर्वीच नवाब मलिक यांना ईडीच्या कोठडीत घरचे जेवण आणि औषधे उपलब्ध करुन देण्यास परवानगी दिलेली आहे.

Screenshot 2022 01 29 09 52 08 45
Img 20220225 wa00038702747946855041624

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये