पुणे शहर

ट्राई सायकलमुळे कर्वेनगरमधील दिव्यांग मुलाचे जगणे झाले सोपे..

प्रमोद शिंदे यांच्याकडून दिव्यांग मुलास ट्राई सायकल भेट..

कर्वेनगर : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कोथरूड मतदार संघाचे माजी अध्यक्ष प्रमोद शिंदे यांच्या वतीने कर्वेनगर भागातील दिव्यांग असणाऱ्या मुलास तीन चाकाची सायकल (ट्राई सायकल) राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या हस्ते भेट देण्यात आली.

यावेळी नगरसेवक दिलीप बराटे, नगरसेविका सायली वांजळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष महेश हांडे, परिसरातील नागरिक व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

संबधित दिव्यांग मुलाच्या घरची परिस्थिती बेताची आहे, तसेच रस्त्याने ये जा करताना पायाच्या अपंगत्वामुळे त्याला मोठा त्रास सहन करावा लागत होता. ही बाब निदर्शनास आल्यानंतर प्रमोद शिंदे व नीता प्रमोद शिंदे यांनी त्याला तीन चाकाची सायकल भेट देण्याचा निर्णय घेतला होता.

ही सायकल संबधित मुलाकडे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आल्यानंतर संबधित मुलाच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद निर्माण झाला. या सायकल मुळे या मुलाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे सहज शक्य होणार असून त्याचा होणार त्रास कमी केल्याने मनाला समाधान मिळाल्याचे प्रमोद शिंदे व नीता शिंदे यांनी सांगितले.

Screenshot 2022 01 29 09 52 08 45

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये