महाराष्ट्र

राज्यपालांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न; काळे झेंडे दाखवले

सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज व सावित्रीमाई फुले यांच्या विषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांवरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात असलेला संताप आता रस्त्यावरही दिसू लागला आहे. सोलापूरमध्ये त्यांचा ताफा अडवून काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

Img 20220303 wa00014169315676050232335
(जाहिरात)

जुळे सोलापूर येथे स्वामी विवेकानंद केंद्राच्या वतीनं योग केंद्र उभारण्यात आलं आहे. या केंद्राच्या उद्घाटन सोहळ्यासाठी कोश्यारी हे सोलापुरात आले. राज्यपालांचा हा दौरा उधळून लावण्याची तयारी शिवप्रेमी संघटना व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी केली होती. संभाजी ब्रिगेड, संभाजी आरमार, मराठा सेवा संघ, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी आसरा चौक परिसरात रस्त्यावर उतरून कोश्यारींच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळं तणावाचं वातावरण निर्माण झालं. डेमॉक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा ताफा अडवून काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून आंदोलकांना ताब्यात घेतलं. ताब्यात घेण्यात आलेल्या आंदोलकांमध्ये डेमॉक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश युवक अध्यक्ष सोहन लोंढे, जिल्हा युवक अध्यक्ष पृथ्वीराज मोरे आणि अजिंक्य रहाणे चांदणे यांचा समावेश आहे. जो ताफा अडवण्यात आला, त्यात राज्यपाल नव्हतेच. ते हेलिकॉप्टरनं कार्यक्रमस्थळी रवाना झाले.

Screenshot 2022 01 29 09 52 08 45

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये