पुणे शहर

पार्थ पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन..

पुणे : पार्थ पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे खडकवासला अध्यक्ष कुणाल वेडेपाटील आणि We Care Health यांच्या संयुक्त विद्यमाने पाषाण येथे भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरामध्ये विविध आजारांवरच्या फिजिओथेरपी तपासणी सोबतच फुल बॉडी चेकअप, ब्लड टेस्ट इत्यादि चाचण्या पार पडल्या. यावेळी तज्ञ डॉक्टरांनी नागरिकांना विविध आजारांवर मार्गदर्शन व डाएटविषयक सल्ला देखील दिला.

दिनांक १९ व २० मार्च असे दोन चाललेल्या या शिबिरात ४७४ नागरिकांनी सहभाग घेतला. हे शिबीर संपूर्णतः मोफत असल्याने शिबिरात सहभागी झालेल्या नागरिकांनी शिबिराच्या आयोजनाबद्दल आभार व्यक्त केले.

Fb img 1647413731457

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये