डिझेलच्या दरात 25 रुपयांनी वाढ

नवी दिल्ली : घाऊक ग्राहकांना विकले जाणारे डिझेल (Diesel) प्रतिलीटर 25 रुपयांनी महागले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या (Crude oil) किमतीत 40 टक्क्यांनी वाढ झाल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. मात्र, पेट्रोल पंपांवरून विकल्या जाणाऱ्या डिझेलच्या किरकोळ दरात कोणताही बदल झालेला नाही.
या महिन्यात पेट्रोल पंपांच्या विक्रीत 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. बस फ्लीट ऑपरेटर आणि मॉल्ससारख्या मोठ्या ग्राहकांनी पेट्रोल (petrol) पंपांवरून इंधन खरेदी केले आहे. सहसा ते थेट पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधन घेतात. यामुळे इंधन रिटेलिंग कंपन्यांचा तोटा वाढला आहे. नायरा एनर्जी, जिओ-बीपी आणि शेल या कंपन्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. घाऊक वापरकर्त्यांना विकल्या जाणार्या डिझेलची किंमत मुंबईत 122.05 रुपये प्रति लीटर झाली आहे. पेट्रोल पंपावर हाच दर 94.14 रुपये इतका आहे.




