पुण्यात या ठिकाणी गोवा बनावटीचा मोठा दारूसाठा जप्त ; राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

पुणे : पुण्यात आणल्या जात असलेल्या गोवा बनावटीच्या मद्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने गांधी सप्ताह निमीत्त मोठी कारवाई केली. या कारवाईत मोठा दारू साठा जप्त करण्यात आला आहे. गोव्यातून कमी कमितीत मद्यसाठा खरेदी करून महाराष्ट्रात तो जास्त किंमतीने विक्रीसाठी आणला जात होता. यात शासनाचे मोठया प्रमाणात अबकारी कराचे नुकसान होत होते. A large stock of Goa-made liquor seized at this place in Pune; A major action by the State Excise Department
निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सी विभाग, पुणे यांनी कात्रज गावच्या हद्दीत हॉटेल रूद्र चायनिजसमोर, पुणे सातारा रोडवर कात्रज घाटाजवळ भिलारेवाडी येथे ही कारवाई केली. मिळालेल्या गुप्त माहितीद्वारे दिनांक ०२ ऑक्टोबर व ०४ ऑक्टोबर २०२२ रोजी छापे टाकून ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकुण गोवा बनावटीचा रू. १ लाख ८८ हजार २५५ रुपयांचा मद्यसाठा तसेच कार व पिकअप टेप्मोसह एकूण ८ लाख ८८ हजार २५५ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदरचे मद्य गोवा राज्यात कमी किमतीत खरेदी करून महाराष्ट्र राज्यात जास्त दराने विक्री करण्याकरीता येत होते. यात शासनाचा मोठया प्रमाणात अबकारी कराचे नुकसान होत होते. सदर गुन्हयातील आरोपी गणेश सुरेश शिंदे (रा.मु. पो राहटवडे ता. हवेली जि. पुणे, अमित शरद वालेकर (रा. मु. पो. भुईंज ता. वाई जि. सातारा) या दोन आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन्ही आरोपींना ५ दिवस पोलीस कस्टडी रिमांड दिला होता. दोन्ही आरोपींना दि. ०७/१०/२०२२ रोजी हजर केले असता न्यायालयाने सदर गुन्हयाची व्याप्ती व आरोपींचा सहभाग लक्षात घेता दोन्ही आरोपींचा जामीन नाकारून त्यांची न्यायालयीत कस्टडी येरवडा कारागृहात रवानगी केली.

सदरची कारवाई आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य मुंबई कांतीलाल उमाप, संचालक दक्षता व अंमलबजावणी सुनिल चव्हाण, विभागीय उप-आयुक्त, अनिल चासकर, अधीक्षक चरणसिंग राजपूत यांच्या मार्गदशनाखाली निरीक्षक आर. पी. शेवाळे, दुय्यम निरीक्षक सी.एस.रासकर, एम. डी. लेंढे, कर्मचारी एस. एस. लोहकरे, एस. जे. भोर, व्ही. एस. परते, यु.एस. भाबड, यांनी भाग घेतला सदर गुन्हयाचा पुढील तपास आर. पी. शेवाळे, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सी विभाग, पुणे करत आहेत.






