पुणे शहर

महाराष्ट्रातील एका नेत्यामुळे राज्य अस्थिर,स्वत:चा पक्षही अस्थिर केला; मोदींचा पवारांवर घणाघात

पुणे : महाराष्ट्रातल्या एका नेत्यामुळे राजकारण अस्थिर झालं आहे, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. गरीबी कधी हटवणार असं विचारलं तरा राहुल गांधी म्हणतात खटाखट असं म्हणत मोदींनी राहुल गांधींवरही निशाणा साधला आहे. पुण्यातील रेसकोर्स मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महायुतीच्या प्रचारार्थ सभेत हे वक्तव्य केलं आहे.

पुण्यातील महायुतीचे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, बारामती लोकसभा मतदार संघातील उमेदवार सुनेत्रा पवार, शिरूर मधील उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील, मावळ मधील उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये मोदी बोलत होते. यावेळी पुण्यातील उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी दिग्विजय पगडी घालत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सन्मान केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, हर्षवर्धन पाटील आदी उपस्थित होते.

Img 20240404 wa00206766960702058843704

पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले की, काही भटके आत्मे आहेत. स्त्रीची इच्छा पूर्ण झाली नाही तर ती भटकत राहते. ती स्वतःही समाधानी नाही आणि इतरांनाही अस्थिर करत राहते. महाराष्ट्रातील एका नेत्याने हा खेळ 45 वर्षांपूर्वी सुरू केला. त्यानंतर अनेक मुख्यमंत्र्यांची पदे अस्थिर झाली. हे भटके आत्मे केवळ विरोधकांनाच अस्थिर करत नाहीत, तर स्वतःच्या पक्षालाही अस्थिर करतात. एवढेच नाही तर, स्वतःच्या कुटुंबातही अस्थिरता निर्माण होते. या भटक्या आत्म्याने 1995 च्या आघाडी सरकारलाही अस्थिर करण्याचा प्रयत्न केला होता आणि 2019 मध्ये या आत्म्याने जनादेशाचा अपमान केला होता, असं म्हणत मोदींनी नाव न घेता शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

60 वर्षांपर्यंत राज्य केलं, पण देशातील अर्ध्या जनतेला मूलभूत सुविधाही देऊ शकले नाही. आम्हाला फक्त 10 वर्ष सेवा करण्याची संधी मिळाली. या दहा वर्षांत मूलभूत सुविधांसोबत जनतेच्या आकांक्षाही पूर्ण केल्या आहेत. गावागावात चांगले रस्ते मूलभूत सुविधा पाहून चांगलं वाटतं की नाही. पुणे मेट्रो पाहा, पुणे विमानतळ पाहा, समृद्धी महामार्ग पाहा, हे आधुनिक भारताचं चित्र आहे. महाराष्ट्राच्या जनतेला ही मोदीची गँरेंटी आहे की, तुम्ही लवकरच देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमध्ये प्रवास कराल, असं आश्वासन मोदींनी दिलं आहे.

Img 20240404 wa00142311409567432001146
Img 20240404 wa00154462680026350583661

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये