पुणे शहर
पुण्यात सीबीआयची मोठी कारवाई आयएस अधिकाऱ्याला 8 लाखाची लाच घेताना रंगेहाथ पकडले.

पुणे: पुण्यात महसूल विभागात एका उच्च अधिकाऱ्यावर सीबीआयने छापे टाकले आहेत. अतिरिक्त महसूल विभागीय आयुक्त अनिल हिरमोड यांच्यावर सीबीआयचा छापे टाकले आहेत.विभागीय आयुक्त कार्यालयात सीबीआय अधिकारी दाखल झाले आहेत.
८ लाख रुपयांची लाच घेताना त्यांना सीबीआयने ही धाड टाकली.
प्राथमिक माहितीनुसार, हा सगळा व्यवहार हायवेच्या लगत असलेल्या एका जमिनीबाबत होता. हिरमोड यांनी ८ लाख रुपये स्वीकारताना त्यांना सीबीआयने त्यांना पकडले. सीबीआयने या संदर्भात सापळा रचला होता.







