मानव फाऊंडेशन , आय एस आय ब्लड बैंक व रोटरॅक्ट क्लब वारजे यांच्या तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन

पुणे : मानव फाऊंडेशन , आय एस आय ब्लड बैंक व रोटरॅक्ट क्लब वारजे यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. कोवीड 19 मुळे रक्ताचा होणारा तुटवडा लक्षात घेऊनच या संस्थानी ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ३१ रक्त दात्यांनी रक्त दान केले
पुण्यातील राजु शिंदे सभागृहात शास्त्री नगर कोथरुड हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ॲड किशोर शिंदे माजी नगरसेवक मनसे पुष्पा कनोजिया माजी नगरसेविका ,
राम बांगड सर (रक्ताचे नाते संस्थापक ),प्रशांत कनोजिया (हेल्प रायडर्स संस्थापक ),संजय काळे प्रभाग अध्यक्ष मनसे,
डाॅ. अनामिका उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रेया ढुमे व सचिन पै यांनी केले.
मानव च्या संस्थापक अध्यक्ष म्रिती अग्रवाल व रोटरॅक्ट क्लब वारजे चे अध्यक्ष संकेत अग्रवाल यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल सर्वांनी त्यांचे कौतुक केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यात दोन्ही संस्थाचे सर्वच सभासदांकडून विषेश प्रयत्न करण्यात आले. व या उपक्रमासाठी इशा गोरे (प्रोजेक्ट हेड)व रुचिता चौधरी (प्रोजेक्ट गाईड ) वामन जहागीरदार यांनी आयोजन केल. कार्यक्रमात सर्व सोशल डिस्टंसिग च्या नियमांचे पालन करण्यात आले.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन इशा गोरे यांनी केले










