पुण्यातील अलका टॉकीज चौकात प्रख्यात शिल्पकार प्रमोद कांबळे साकारणार हे प्रभू श्री रामाचे लाईव्ह मुर्ती शिल्प राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष दीपक मानकर यांची माहिती
पुणे : पुणे शहरात प्रख्यात शिल्पकार प्रमोद कांबळे करणार प्रभू श्रीरामाच्या भव्य मूर्ती शिल्पाचे आयोजन संपूर्ण देशात अयोध्या नगरीतील श्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेची जय्यत तयारी सुरु आहे. श्रीराम भाविकांकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. त्याच निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहराध्यक्ष दीपक माधवराव मानकर यांच्या संयोजनातून प्रथमच पुणे शहरात प्रभु श्रीरामाचे भव्य मुर्ती शिल्प साकारण्याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात येणार आहे.
दीपक मानकर म्हणाले, प्रख्यात शिल्पकार प्रमोद कांबळे हे प्रभू श्री रामाचे लाईव्ह मुर्ती शिल्प साकारणार आहेत. आपण सर्व श्री राम भक्तांकरिता प्रत्यक्षात मुर्ती साकारताना पाहणे, हा एक आनंददायी आणि अविस्मरणीय क्षण होणार आहे. सर्व राम भक्तांनी हा संस्मरणीय अनुभव घ्यावा. सदर कार्यक्रम सोमवार, दि.२२ जानेवारी, २०२४ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी १० वाजेपर्यंत अलका टॉकीज चौक, एल. आय. सी ऑफिसजवळ, पुणे येथे संपन्न होणार आहे.