प्रशासनाने कामगारांसाठी औद्योगिक वसाहतीमध्ये विनामूल्य टेस्ट करण्याची यंत्रणा उभारावी : संजय भोर

पुणे : पुणे महानगरपालिका आयुक्तांच्या आदेशानुसार पुणे शहरातील सर्व उद्योग व आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी covid-19 निगेटिव्ह, आर टी पी सी आर किंवा अँटीजन रॅपिड टेस्ट प्रमाणपत्र सोबत ठेवण्याचे आदेशित केले आहे. परंतु लाखोंच्या संख्येने असलेल्या कर्मचाऱ्यांच्या टेस्ट करणे अडचणीचे आहे. त्यामुळे प्रशासनाने सर्व औद्योगिक वसाहतीमध्ये ह्या टेस्ट विनामूल्य करण्यासाठी यंत्रणा उभी करावी अशी मागणी शिवणे इंडस्ट्रियल असोसिएशन चे अध्यक्ष संजय भोर यांनी केली आहे. Administration should set up free test system for industrial workers in industrial estates: Sanjay Bhor
संजय भोर यांनी म्हंटले आहे की, पुणे शहर व परिसरामध्ये साधारणता लाखोच्या संख्येने कर्मचारी काम करत आहेत. एवढ्या कामगारांच्या टेस्ट एकाच वेळी करणे शक्य नाही व मार्केटमध्ये रॅपिड अँटीजन टेस्ट ची किट उपलब्ध नाहीत. तसेच आरटीपीसीआर टेस्ट करण्यासाठी दिवसभर हॉस्पिटलमध्ये बसले तरी नंबर लागत नाही. हॉस्पिटलमध्ये टेस्ट करायला गेलेला निरोगी माणूस जर कारोना पॉझिटिव्ह पेशंटच्या संपर्कामध्ये आला तर रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याचा ही धोका आहे.

खासगी लॅब मध्ये टेस्ट करण्यासाठी येणारा खर्च हा लहान उद्योगाच्या आवाक्या बाहेर आहे. त्यामुळे प्रशासनाने सर्व औद्योगिक वसाहतीमध्ये ह्या टेस्ट विनामूल्य करण्यासाठी यंत्रणा उभी करावी व सर्वसामान्य उद्योजकांना मदत करावी. तसेच सर्व कामगारवर्गाला कोरोना लस लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी अशी मागणी ही संजय भोर यांच्याकडून करण्यात येत आहे.






