महाराष्ट्र

राज्यात 8 किंवा 14 दिवसांच्या लॉकडाऊनची शक्यता, मुख्यमंत्री म्हणाले, दुसरा पर्याय नाही!

मुंबई : कोरोनाचा उद्रेक रोखून साखळी तोडण्यासाठी महाराष्ट्रात 8 किंवा 14 दिवसांचा कडक लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती.The possibility of an 8 or 14 day lockdown in the state, the CM said, is not another option!    

कोरोनाचा उद्रेक रोखून साखळी तोडण्यासाठी महाराष्ट्रात 8 किंवा 14 दिवसांचा कडक लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तसे संकेत दिले आहेत. यंत्रणांचा शक्तीपात होऊ नये. निर्णय घेण्याची वेळ आली आहे, दुसरा पर्याय नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले.   मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती.  महाराष्ट्राच्या लॉकडाऊनसंबंधात तब्बल सव्वा दोन तास खलबतं या बैठकीत झाली.

IMG 20210223 WA0156

“लॉकडाऊन करायची वेळ आली आहे, कारण यंत्रणांचा शक्तीपात होऊ नये. निर्णय घेण्याची वेळ आली आहे, लॉकडाऊन हा एकमेव मार्ग नाही पण जगानेही तो स्वीकारला आहे”, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. याशिवाय सर्वांच्या सूचना ऐकल्या, चांगल्या आहेत. पण निर्बंध आणि सूट दोन्ही एकाचवेळी शक्य नाही. येत्या दोन दिवसात निर्णय घेऊ, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

पूर्ण लॉकडाऊन केला तर उद्रेक होईल. मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना आवरावं, सतत केंद्राकडे बोट दाखवाल, तर आमच्याकडून सहकार्याची अपेक्षा करु नका, असं रोखठोक मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.

IMG 20210408 WA0012

ऑनलाईन झालेल्या या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस , अजित पवार, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण,  भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती.  संध्याकाळी 5 वा. या बैठकीला सुरुवात झाली, ती जवळपास सव्वा सात वाजेपर्यंत चालली.

लॉक डाऊनची वेळ आली आहे दुसरा कोणता पर्याय नाही, असं  मुख्यमंत्री म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये